For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : अक्कलकोट स्वामी समर्थ पालखीने कुंभोज परिसर भक्तिरसात न्हालला

02:57 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   अक्कलकोट स्वामी समर्थ पालखीने कुंभोज परिसर भक्तिरसात न्हालला
Advertisement

                               “जय जय स्वामी समर्थ” घोषणांनी कुंभोज दुमदुमले

Advertisement

कुंभोज (ता. हातकणंगले) येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुका व पालखीचे आगमन होताच परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. सकाळपासूनच राहुल घोरपडे यांचा निवास स्थानी स्वामी समर्थ महाराजांची पालखी विराजमान झाली होती या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण व “जय जय स्वामी समर्थ” या घोषणांमध्ये पादुका व पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी कुंभोज व परिसरातील अनेक भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. महिलांनी औक्षण करून पादुकांचे दर्शन घेतले, तर अनेक भक्तांनी नारळ, फुले व प्रसाद अर्पण करून स्वामींचा आशीर्वाद घेतला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

Advertisement

या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम शांततामय व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. स्वामी समर्थांच्या पादुका व पालखीच्या दर्शनाने भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा संचारल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.