महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोपी खासदाराचा अखिलेश यांच्याकडून बचाव

06:51 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप : सप प्रमुखाने भाजप कार्यकर्त्यांना ठरविले जबाबदार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

उत्तरप्रदेशच्या संभल येथील हिंसेप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्ररहमान बर्क यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सप प्रमुख अखिलेश यादव यांनी बर्क यांचा बचाव केला आहे. खासदार आणि आमदारासमवेत शेकडो लोकांना खोट्या गुन्ह्यात गोवले जात असल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे. संभल येथे जाण्याचा निर्णय सप नेत्यांनी रद्द केला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे लवकरच संभल येथे जाऊ शकतात असे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी सांगितले आहे.

संभल येथे अनेक लोकांचा जीव गेला असताना, दु:खाच्या वातावरणात उत्सव साजरा कसा केला जाऊ शकतो. संभलचे खासदार आणि तेथील आमदारावर खोटे गुन्हे नेंद करण्यात आले आहेत. संभल येथील हिंसेप्रकरणी राज्य सरकार जबाबदार आहे. मशिदीत एकदा सर्वेक्षण झाले असताना दुसऱ्यांदा तेथे सर्वेक्षण का करण्यात आले असे प्रश्नार्थक विधान अखिलेश यांनी केले आहे.

सर्वेक्षण टीमसोबत तेथे भाजप कार्यकर्ते उपस्थित होते, जे प्रक्षोभक घोषणा देत होते. त्यांच्या विरोधात कारवाई झालेली नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांना संभल येथे जाण्यापासून रोखण्यासाठी तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भाजप हा मनविधानावर चालू इच्छित आहे, संविधानानुसार नाही असा आरोप अखिलेश यांनी केला आहे.

राहुल गांधींकडून राज्य सरकारवर आरोप

संभल वादात राज्य सरकारची भूमिका अत्यंत पक्षपात करणारी होती. हिंसा आणि गोळीबारात स्वकीयांना गमाविलेल्या लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रशासनाकडून सर्व बाजू न ऐकून घेता आणि असंवेदनशीलपणे कारवाई करण्यात आल्याने वातावरण बिघडले आणि हे अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण ठरले, याकरता राज्य सरकार थेट जबाबदार असल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच त्यांनी संभल वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप करावा असे म्हणत भाजप सत्तेचा वापर हिंदू-मुस्लीम समुदायांदरम्यान मतभेद निर्माण करण्यासाठी करत असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article