महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युवा क्रीडापटूंना अखिल कुमारचे आवाहन

06:06 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील क्रीडा क्षेत्रात वावरणाऱ्या नवोदित युवा क्रीडापटूंनी स्वत:ला उत्तेजक द्रवापासून अलिप्त राखावे, असे आवाहन भारताचा माजी मुष्टियुद्धा तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि विद्यमान सहाय्यक पोलीस आयुक्त अखिलकुमारने केले आहे.

Advertisement

43 वर्षीय अखिलकुमारने 2006 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच त्याने 2008 च्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. येथील जवाहरलाल बाग स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुमारे 100 क्रीडापटूंशी संपर्क सधताना अखिलकुमारने आपले वरिल मत व्यक्त केले. जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजक विरोधी संघटना कार्यरत आहे. खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली जाते आणि त्यामध्ये काहीजण दोषी आढळतात. निर्बंध घातलेल्या द्रवाचे क्रीडापटूंनी सेवन न करण्याची खबरदारी नेहमी घ्यावी, असेही अखिलकुमारने म्हटले आहे. अखिलकुमारला यापूर्वीच अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article