For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अकासा एअर आयपीओ आणण्याचा करतेय विचार

06:40 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
अकासा एअर आयपीओ आणण्याचा करतेय विचार
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअर पुढील दोन ते चार वर्षांमध्ये आपला आयपीओ आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थात कंपनीची या दरम्यानची एकंदर वाटचाल लक्षात घेऊन आयपीओ सादरीकरणाची तारीख व वर्ष निश्चित केले जाणार आहे. कंपनीचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अंकुर गोयल यांनी ही माहिती दिली आहे. हवाई कंपनीचा आयपीओ आणला जाणार आहेच, यामध्ये वाद नाही. मात्र तो कधी सादर करायचा, हे अद्याप निश्चित झालेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

34 शहरांना सेवा

Advertisement

ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीने आपली विमानसेवा सुरू केली आहे. सध्याला 34 ठिकाणी आपली विमानसेवा कंपनीने सुरू ठेवली आहे. या व्यतिरिक्त 7 आंतरराष्ट्रीय ठिकाणांना कंपनी विमानसेवा पुरविते. केवळ चार वर्षांची असणारी ही कंपनी आता 39 विमानांसह स्पर्धा करायला सज्ज झाली आहे. 2032 पर्यंत विमानांची संख्या 226 पर्यंत वाढविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. पुढील दोन ते चार वर्षांमध्ये कंपनीच्या वाटचालीचा अंदाज घेतल्यानंतर आयपीओ संदर्भातील तारीख जाहीर केली जाणार आहे. योग्य तो नफा, रोखीची उपलब्धता यासह इतर बाबींचा विचार यासाठी सर्वंकषपणे केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.