For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबमध्ये अकाली दलाला झटका, आमदार ‘आप’मध्ये सामील

06:26 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाबमध्ये अकाली दलाला झटका  आमदार ‘आप’मध्ये सामील
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचे एकमेव दलित आमदार डॉ. सुखविंदर सुखी हे बुधवारी आम आदमी पक्षात सामील झाले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. अकाली दलाचे अन्य आमदार मनप्रीत अयाली यांच्याबाबत सहमती झाली तर त्यांच्याविषयी निर्णय घेऊ असे मान यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकरणी आम्ही केंद्र सरकारला आमची भूमिका कळविली आहे. केंद्र सरकारने प्रथम उत्तरप्रदेश आणि हरियाणातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पहावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी लुधियाना आणि जालंधरमध्ये कंत्राटदारांमध्ये पेमेंटवरून वाद झाला होता असा दावा मान यांनी केला आहे.

Advertisement

उर्वरित प्रकल्पांसंबंधी शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहणाच्या भरपाईवरून मुद्दे प्रलंबित आहेत. त्यासंबंधी सरकारच्या वतीने लवादासोबत अशाप्रकरणांची समीक्षा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्री मान यांनी केला. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. राज्यपाल सरकारच्या कामकाजात अडथळे निर्माण करणार नसतील तर मला अशा बैठकीबद्दल कुठलाच आक्षेप नसल्याचे मान यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.