For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉक्टरच्या लॉकरमध्ये सापडली एके-47 रायफल

06:51 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
डॉक्टरच्या लॉकरमध्ये सापडली एके 47 रायफल
Advertisement

जैश-ए-मोहम्मद समर्थक डॉक्टरला सहारनपूरमध्ये अटक

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीनगर, सहारनपूर

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमधील डॉ. आदिल अहमद याच्या लॉकरमधून एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. आदिल अहमद हा अनंतनागचा रहिवासी असून तो अनंतनागमधील जीएमसीमध्ये काम करत होता. पोलिसांनी सध्या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करत डॉक्टरला अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. डॉक्टरकडून रायफल जप्त करणे हे दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

जम्मू काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदला पाठिंबा देणारे पोस्टर लावल्याबद्दल उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून डॉक्टरला ताब्यात घेतले होते. संबंधित डॉक्टरचे नाव आदिल अहमद पूर्वी अनंतनागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत होता. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी अनंतनागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या लॉकरची झडती घेतली असता एके-47 रायफल सापडल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

दहशतवादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करण्याच्या चालू मोहिमेचा भाग म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांनी तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्यांच्या बॅरेकचीही झडती घेतली. दहशतवादी परिसंस्था नष्ट करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या कारवाईदरम्या दुपारी 12 वाजेपर्यंत काश्मीर खोऱ्यात 111 घरांची झडती घेण्यात आली.

विनापरवाना शस्त्रे बाळगल्याबद्दल कठोर शिक्षा शक्य

भारतीय शस्त्रास्त्र कायदा 1959 नुसार परवान्याशिवाय आधुनिक/निषिद्ध शस्त्रs बाळगल्याबद्दल कठोर शिक्षेची तरतूद आहे. जर शस्त्र कोणत्याही दहशतवादी/बेकायदेशीर कृती किंवा संघटनेशी जोडलेले आढळले तर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत खटला दाखल केला जातो.

Advertisement
Tags :

.