For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे किंगमेकरचे स्वप्न भंगले

07:07 PM Jan 17, 2026 IST | NEETA POTDAR
sangli politics   अजितदादांच्या राष्ट्रवादीचे किंगमेकरचे स्वप्न भंगले
Advertisement

                             भाजप-राष्ट्रवादी संभाव्य सत्ता गठबंधनावर राजकीय चर्चा

Advertisement

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाने आपली ताकद दाखवित तब्बल १६ जागांवर विजय मिळविला आहे. यश समाधानकारक मिळाले असले तरी किंगमेकरच्या भूमिकेचे स्वप्न मात्र भंगताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पश्नाची महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होती. पक्षाने महायुतीत ३३ जागांची मागणी केली होती मात्र भाजपाने इतक्या जागा देण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविली होती पश्नाला ७८ पैकी १६ जागांवर विजय मिळाला. पश्नाला मिरजेत अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या मात्र सांगलीत घोर निराशा झाली.

Advertisement

मिरजेत २३ पैकी ९, सांगलीत ३९ पैकी फक्त पाच तर कुपवाडमध्ये १२ पैकी दोन जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वता अजितदादांनी मिरजेत सभा घेतली होती. आमदार इदिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पदमाकर जगदाळे यांच्यासह मनपा क्षेत्रातील नेत्यांमुळे हे यश मिळाले आहे.

मिरजेतील यश हे संबधित उमेदवारांच्या ताकदीवरचे आहे. मात्र हे यश पक्षाच्या मतानुसार समाधानकारक नाही. पक्षाच्या नेत्यांनी किमान २० ते२२ जागा जिंकूच असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र सहा ते सात जागा कमीच मिळाल्या आहेत. मनपा निवडणूकीच्या निकालानंतर मनपाच्या सत्ता स्थापनेत आम्हीच किंगमेकरच्या भूमिकेत असणार असा दावा पश्नाकडून करण्यात आला होता, मात्र भाजपाला ३९ जागा मिळाल्या आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.

बहुमताचा ४१ जागांचा आकडा शिंदे सेनेमुळे होत असल्याने राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाची भाजपाला सत्ता स्थापनेसाठी गरज दिसत नाही. तसे झाल्यास किंगमेकर ठरण्याचा पक्षाच्या नेत्यांचा दावा फोलच ठरणार आहे. भाजपला स्थिर सत्ता हवी असल्यास अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागेल, महापौर पदाचे आरक्षण अध्याप जाहीर झाले नाही, आरक्षणानंतर प्रत्यश्न महापौर आणि उपमहापौर निवडीवेळीच अजितदादा पवार पश्न भाजपाबरोबर जाणार की विरोधात बसणार हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.