Solapur News : उमरग्यात अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे भावपूर्ण वातावरणात दर्शन
03:31 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
अस्थिकलश दर्शनासाठी उमरग्यात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी
Advertisement
धाराशिव उमरगा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी सकाळी उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यासह शरण पाटील, अजिंक्य पाटील, अमोल मोरे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
Advertisement
अस्थिकलशाच्या दर्शनावेळी उपस्थित अनेकांच्या भावना अनावर झाल्या असून काही जणांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसून आले. परिसरात शोकाकुल वातावरण होते.
Advertisement