For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजित पवार गटाचे दोन्ही नेते शरद पवारांच्या भेटीला! पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यात के.पी. आणि ए.वाय. एकत्र ?

04:45 PM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
अजित पवार गटाचे दोन्ही नेते शरद पवारांच्या भेटीला  पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यात के पी  आणि ए वाय  एकत्र
Sharad Pawar Kolhapur K.P. Patil A.Y. Patil
Advertisement

शऱद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आज राधानगरी तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा गती मिळाली . अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून ते लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच काही दिवसापुर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. या पार्श्वभुमीवर राधानगरीतील दोन्ही महत्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने केपी आणि एवाय हे दोघेजण महायुतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यमध्ये त्यांनी काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटंबासह उद्योजक शिरीष सप्रे यांच्या कुटंबांची सात्वनपर भेट घेतली.

आज सकाळी शरद पवार यांनी माध्यमांना संबोधित केले. या पत्रकार परिषदेला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के.पवार, जिल्हाध्यक्ष के.डी. पाटील उपस्थित होते. तर अजित पवार गटाचे बिद्री कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार केपी पाटील यांच्यासह एवाय पाटील यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Advertisement

गेल्या वर्षभरापासून राधानगरी तालुक्यातील राजकारण दोलायमान अवस्थेत असताना बिद्रीच्या राजकारणामुळे पुन्हा सक्रिय झाले. गत हंगामात संपुर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आणि येणाऱ्या विधानसभेच्या राजकारणाची बिजे रोवली गेली होती. आपली एकहाती सत्ता कायम ठेवत माजी आमदार केपी पाटील यांनी आपण अजूनही विधानसभेच्या रिंगणात आमदार प्रकाश आबिटकर यांना आव्हान असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि खासदार शाहू महाराजांचे जोरदार स्वागत या कृतीतून महाविकास आघाडीशी अधिक जवळीक वाढवली. असे असले तरी महाविकास आघाडी अंतर्गत राधानगरीची जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर के. पाटलांचा पक्ष ठरणार आहे.

दुसऱीकडे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेऊन आपली वाटचाल महाविकास घाडीच्या दिशेने असल्याचं दाखवून दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना जाहीर पाठींबा देऊन त्यांनी राधानगरीमधून ताकद देण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर सलगी वाढवून राधानगरीची जागा जर काँग्रेसला सुटली तर आपण इच्छुक असल्याचंही त्यांनी सुचवलं आहे.

दोघे आमच्या बरोबरचं...
कोल्हापूरच्या दौऱ्यात शरद पवारांना के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे आपल्या बरोबर आल्याने महाविकास आघाडीमध्ये येणार आहेत का असा प्रश्न विचारला असता. त्यांनी दोन्हीही नेते आमच्या बरोबरच असल्य़ाचं म्हटलं आहे. त्यामुळे राधानगरीतील या दोन्ही नेत्यांबाबत कोणताही कटुभाव नसल्याचं शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं

Advertisement
Tags :

.