For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ajit Pawar : वक्तशिर, रोखठोक, शब्दाला वजन , विकासावर भर देणारे ' अजित दादा'

07:20 PM Jan 28, 2026 IST | NEETA POTDAR
ajit pawar   वक्तशिर  रोखठोक  शब्दाला वजन   विकासावर भर देणारे   अजित दादा
Advertisement

                                 उपमुख्यमंत्री अजित पवार हे, वेळेला महत्व देणारे होते

Advertisement

कोल्हापूर : आठ एप्रिल २०२२ स्थळ जिमखाना मैदान वेळ सायंकाळी सात वाजता पावसामुळे आपल्याला थोडा वेळ लागला अशी आल्या-आल्या दिलगिरी व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे, वेळेला महत्व देणारे होते. दिलेल्या, सांगितलेल्या वेळेला किंवा वेळेपूर्वी हजर होणाऱ्या दादामध्ये, वक्तशिरपणा रोखठोकपणा, दिलेला शब्द पाळणे त्यागाबरोबर सर्वसामान्यांगा विगार करणारे दादा आज आपल्यातून निघून गेले.

क्रिडाई कोल्हापूरतर्फे शिवाजी पार्क येथील जिमखाना मैदानावर, चालणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू व बांधकाम विषयक आयोजित 'दालन २०२२' च्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील तर कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंहलिक व आमदार ऋतुराज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. पावसामुळे आपल्याला थोडा वेळ लागल्याची दिलगिरी अजित पवार यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात राजकीय भाष्य न करता कोल्हापूरच्या विकासाच्या व प्रश्नावरच त्यांनी भाषण केले. याो उ‌द्घाटन सायंकाळी ६ वाजता होणार होते. त्यादिवशी कोल्हापूरात धुव्वाधार पाऊस सुरू होता. पावसामुळे समोरील कांही। दिसत नव्हते. सहा वाजता येणारे दादा थेट कोल्हापूरात न येता बैळगाव येथे विमानाने उतरून सहा ऐवजी सात वाजता जिमखाना मैदानावर दाखल झाले. स्टेजवर आल्याबरोबर त्यांनी सर्व उपस्थितांगी माफी मागितली. या क्रिहाई दालनमधील भाषणातील मुद्दे.....

Advertisement

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी एकावेळीच सर्व गावांचा समावेश करू नका नाहीतर हा निर्णय अंगशी येईल. जिल्हातील दोन्ही मंत्र्यानी जनतेचे मत घेऊन व शेती प्रधान गावांचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा शेती प्रधान गावांना बाजूला ठेऊन, कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विचार नागरी भागातूनच सुरू करा. असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. तुम्हाला चांगल्या सुविधा हव्या असतील तर, त्याबरोबर कठोर भूमिकाही घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्वांना एकत्र व विश्वासात घेवूनच कोल्हापूरचा विकास होईल यासाठी मी तुमच्या पाठीशी असून, तुम्हाला लागेल तेवढा निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी माझी राहील असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यानीं यावेळी दिला.

क्रिडाई कोल्हापूर तर्फे शिवाजी पार्क येथील जिमखाना मैदानावर, चालणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू व बांधकाम विषयक आयोजित 'दालन २०२२ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील तर कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व आमदार ऋतुराज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. पावसामुळे आपल्याला थोडा वेळ लागल्याची दिलगिरी अजित पवार यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात राजकीय भाष्य न करता कोल्हापूरच्या विकासाच्या व प्रश्नावरच त्यांनी भाषण केले.

रेरा, भोगवटा, बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संबधीत मंत्र्याशी टप्प्या-टप्याने भेट घेऊन, त्यांचे प्रश्न सोडवू. मध्यम व गरीब वर्गातील लोकासाठी घरे उपलब्ध करण्यासाठी क्रिडाईने पुढाकार घ्यावा बांधकाम व्यावसायिकावर इतर २५० उद्योग अवलंबून आहेत. स्टिल, सिमेंटसह इतर कन्या मालाच्या दरवाढीमुळे बांधकाम थांबवू नका. यासाठी दरवाढीची कारणे काय आहेत याचा आपण अभ्यास करणार असल्यागे स्पष्ट केले होते.

झोपडपट्टी निर्मूलन योजनेर्तगत सांगली, साताऱ्यासह कोल्हापूरात ही योजना साकारणार असल्याचे पवार यांनी सांगून, यामध्ये पारदर्शकता आणून यामध्ये बदल करणार आहे. महापालिका, जिल्हापरिषद यांच्या निवडणूका पुढे गेल्याने आता नेत्यांना लोकांचे काम करण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध झाला आहे. हा वेळ जनतेसाठी वापरा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Advertisement
Tags :

.