For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पा विरोधात आजगाववासियांचा ' एल्गार '

04:19 PM Jun 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पा विरोधात आजगाववासियांचा   एल्गार
Advertisement

सर्वपक्षीयांचा खंबीरपणे पाठिंबा

Advertisement

सातार्डा -
आजगाव दशक्रोशीमध्ये होऊ घातलेल्या जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी ग्रामदैवत वेतोबा मंदिरामध्ये जनआंदोलन छेडले. जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला परस्पर सुरुवात केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या विरोधात कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. या जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पामध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला.या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी आमदार वैभव नाईक, उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, आरोंदा विभागाचे जि. प .सदस्य सुदन कवठणकर, ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख संतोष गोवेकर,शेखर आजगावकर, ऍड. स्वप्नील आजगावकर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.जेएसडब्लू मायनिंग लॉबीचे प्रस्थ वाढत चालले आहे. मायनिंग प्रकल्पामुळे रेडी गाव भकास करण्यात आला आहे. तशी दयनीय स्थिती आजगाव, धाकोरा, भोमवाडी, तिरोडा,शिरोडा, आरवली,आसोली गावांची होणार आहे.शेती,कोकम, नारळ बागायती तसेच सुरंगीचे उत्पादन दशक्रोशीमध्ये मोठया प्रमाणात घेतले जाते. मायनिंग प्रकल्प लादल्यास ग्रामस्थांच्या पारंपारिक उत्पन्नाचा स्रोत नष्ट होणार आहे. त्यामुळे मायनिंग प्रकल्पाला दशक्रोशीमधून कडाडून विरोध करण्यात येत आहे.माजी आमदार वैभव नाईक, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, रुपेश राऊळ, सुदन कवठणकर व कार्यकर्त्यांनी मायनिंग प्रकल्पाला ठामपणे विरोध दर्शवीला. मायनिंग प्रकल्प हद्दपार होउदे असे गाऱ्हाणे श्री वेतोबा मंदिरामध्ये घालण्यात आले. मायनिंग प्रकल्पाच्या सूत्रधारांना धारेवर धरण्यात आले.ऍड स्वप्नील आजगावकर यांनी पुढाकार घेऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन शांततेत मिटविण्यासाठी प्रयत्न केले. आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजफाटा होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.