For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अजय माकन, नासीर हुसेन, जे.सी. चंद्रशेखर यांना काँग्रेसचे तिकीट

06:22 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अजय माकन  नासीर हुसेन  जे सी  चंद्रशेखर यांना काँग्रेसचे तिकीट

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

येत्या 27 फेब्रुवारी कर्नाटक विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभेतील सदस्यबळानुसार काँग्रेसला चारपैकी तीन जागा मिळणे अपेक्षित आहे. याकरिता हायकमांडने माजी केंद्रीयमंत्री अजय माकन यांना कर्नाटकातून तिकीट जाहीर केले आहे. तर आणखी दोन जागांसाठी राज्यसभेचे विद्यमान सदस्य नासीर सय्यद हुसेन आणि जे. सी. चंद्रशेखर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. एआयसीसीचे खजिनदार असणारे अजय माकन यांना कर्नाटकातून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसमधून या वेळेस नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, ही अपेक्षा फोल ठरली आहे. भाजपने यापूर्वीच एका जागेसाठी नारायणसा भांडगे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेसचे तीन आणि भाजपच्या एका उमेदवाराकडून गुरुवारी अर्ज दाखल होईल.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.