For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजय लमाणीची राज्य संघात निवड

10:58 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
अजय लमाणीची राज्य संघात निवड
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षाखालील दक्षिण विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 15 सदस्यीय संघात बेळगावच्या नीना स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू अजय लमाणीची यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. आंध्र प्रदेशातील विजयनगरमध्ये ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.

Advertisement

कर्नाटक संघ - समर्थ सुरेश (कर्णधार), पवनदीप भरडकणे, प्रभाव पायडा, अखिरा, हन्नान झाकी अहमद, आत्रेय भट्ट (यष्टीरक्षक), आर्यन नागेश, कृष्णा, एम. नीरज, सम्राट आदित्य, आशिथ गिरीश, अजय लमाणी (यष्टीरक्षक), चेरन तेजराजू, रायन तोमर आणि व्ही. नायडू आदी खेळाडूंचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून आदित्य सागर, व्यवस्थापक म्हणून महालिंगा, स्टेंथ अॅण्ड कंडिशनिंग कोच म्हणून समीउर रहमान आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून विनय कुमार जी. डी. काम पाहणार आहेत. अजय हा लव्हडेल सेंटर स्कूलचा विद्यार्थी असून त्याला प्रशिक्षक मजीद मकानदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.