For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपला धक्का ; अजय गोंदावळेंचा शिवसेनेत प्रवेश

12:22 PM Oct 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
भाजपला धक्का   अजय गोंदावळेंचा शिवसेनेत प्रवेश
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय गोंदावळे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्ते अजय गोंदावळे यांनी सांगितले. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी शिवसेना पक्ष बांधणीचा धडाका सुरू केला आहे. अनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तसेच भाजपाचे कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शुक्रवारी भाजपच्या अजय गोंदावळे आणि त्यांच्या चाळीस सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सावंतवाडी शहरात हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकीत भाजप तर्फे मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहेत. परंतु , आम्ही सर्व तयारीनिशी निवडणुकीत उतरणार आहोत. पक्ष संघटना मजबूतरितीने बांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक प्रवेश आगामी काळात होतील. आमदार दीपक केसरकर हे विकासासाठी कार्यशील आहेत. तर निलेश राणे हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे पक्ष बांधणीही होत आहे. प्रवेशकर्त्यांना फोन येत आहेत. परंतु ,कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये . मी भक्कमपणे पाठीशी उभा राहीन असा विश्वास संजू परब यांनी कार्यकर्त्यांना दिला . यावेळी, शहरप्रमुख बाबू कुडतरकर ,माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,भारती मोरे ,परीक्षेत मांजरेकर ,विनोद सावंत ,गजानन नाटेकर, क्लेटस फर्नांडिस, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते. दरम्यान या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजप काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.