‘चौहान’ चित्रपटात अजय देवगण
06:12 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
चित्रपटाचा फर्स्ट लुक व्हिडिओ सादर
Advertisement
अजय देवगण पुन्हा एकदा अॅक्शनपॅक्ड चित्रपटावरून चर्चेत आहे. अजय आता ‘चौहान’च्या रुपात एका नव्या आणि दमदार अवतारात परतणार आहे. हा चित्रपट आनंद एल. राय यांच्यासोबतचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडिओजकडून करण्यात येत आहे.
निर्मात्यांनी ‘चौहान’च्या रुपातील अजयचा पहिला लुक जारी केला आहे. यामुळे चित्रपट दमदार आणि अॅक्शनने भरपूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकात 300 युवक होते, घरी केवळ 270 पोहोचले’ असा दमदार डायलॉग व्हिडिओच्या पार्श्वभूमीत ऐकू येतो. तर ‘चूक आमची नव्हती, आदेश वरून आले होते, समोरच्याने दगड उचलला तर जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा’ असा आहे.
Advertisement
Advertisement