For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ajara |आजरा-महागाव बससेवा बंद ?

03:24 PM Mar 25, 2026 IST | NEETA POTDAR
ajara  आजरा महागाव बससेवा बंद
Advertisement

                 आजरा महागाव मार्गावर एस.टी. सेवा चार महिन्यांपासून बंद

Advertisement

आजरा - आजरा हलकर्णी रस्त्याच्या कामाला चार महिन्या पासून सुरवात केली असून, आजरा महागाव रस्ता खुदाई केल्याने, प्रवाशाना धुरळ्याने श्वासोश्वास घेण्याचे अवघड झाले आहे, तर गाडी खाचखळग्यातून चालवणे वाहनधारकाना जिकरीचे झाले असल्याने, एस टी महामंडळाने आजरा महागाव गाडी बंद केल्या आहेत. काही गाड्या नाविलाजाने हात्तिवडे पर्यंत सोडल्या आहेत. आजरा तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना सरकारी कामाकरिता जाणे साठी एस टी सेवा बंद झाल्याने, प्रवाश्याना प्रसंगी पायी प्रवास करावा लागत आहे.

संकेश्वर बांधा रस्त्याप्रमाणे हा रस्ता रूंदी करण करून वेडी वाकडी वळणे निघणार, असा असणारा समज दिशाभूल असलेचे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हलकर्णी चंदगड रस्ता बांधकाम करण्यार्या कंपनी कडे वर्ग केला असल्याने, कंपनीने गेल्या वर्षापासून चंदगड ते श्रृगांरवाडी पर्यंत लोकाना, धुळ चारली आहे. पावसाळ्यात चिखलातून विद्यार्थ्यांना व वयोवृधाना पायपिट करावी लागली. तर नोव्हेंबर पासून आजरा महागाव रसत्यावरील लोकांना धुळ खावी लागत असल्याने, बर्याच प्रवाशाना श्वसनाचे आजार उध्बवले आहेत.

Advertisement

{मलिग्रे ते आजरा हा प्रवास कोकणात जाणारा व रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणारी उंच उंच झाडाच्या मधून असणारा प्रवास संपला असून,रस्ता रुंदीकरणासाठी बर्याच झाडाची बळी गेला आहे.रस्यात्याच्या कामाचे नियोजन दिशाभूल करणारे असून, रस्ता करताना सार्वजनिक वाहतूक व प्रवाशाची अडचण लक्षात घेऊन सुरवातीला मोरी व पुलाचे काम करणे आवश्यक असताना आधी रस्तेच ऊकरून धुळा उडवला आहे.एकाही पट्याची निर्गत लावली नाही, दर दोनशे मिटर वर अर्धवट काम असल्याने सार्वजनिक वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. चार महिन्यापासून आजरा महागाव एस टी वाहतूक बंद असल्याने सर्वसामान्य लोकाचे हाल होत आहे. यासाठी हात्तीवडेकरानी रस्त्यावर येऊन हि काहीच दाद दिली जात नाही. रस्त्यावर मारले जाणारे, पाण्याचे नियोजन बरोबर नाही. तर नैसर्गिक ओढ्याचे पात्र बदलून मोरोचे बांधकाम सुरू आहे. लोकाच्या तक्रारी व गैर सोयी कडे शासनाने डोळे झाकपणा केला असला तरी,
किमान एस टी आगाराने पर्यायी मार्गाने हाजगोळी कोवाडे मलिग्रे मार्ग महागाव व नेसरी अशी गाडी सुरु करून प्रवाशाची सोय करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Advertisement
Tags :

.