For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ajara News : आजरा आठवडा बाजारात सुरमईचा दर १४०० पार

01:04 PM Feb 28, 2026 IST | NEETA POTDAR
ajara news   आजरा आठवडा बाजारात सुरमईचा दर १४०० पार
Advertisement

माशांची आवक मोठी होऊनही दर चढे

आजरा :  येथील शुक्रवारच्या आठवडे बाजारात सुरमईचा दर प्रति किलो १४०० रुपयांच्या पार झाला आहे. तर इतर माशांचे दरही वाढल्याचे चित्र दिसून आले. कोकणातून आजरा मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची आवक होते.

Advertisement

आजरा ही सभोवतालच्या ५० खेड्यांची मुख्य बाजारपेठ आहे. शुक्रवारी आजरा आठवडा बाजारात खेडेगावातून बाजारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे आठवडा बाजारात विविध जातीचे मासे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. आजरा मच्छी मार्केटमध्ये दररोज मासे विक्रीसाठी येत असले तरी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आवक होते.

माशांची आवक मोठी होऊनही दर चढे राहिले. सुरमई मध्यम १००० ते मोठी सुरमई १४०० रुपये किलो इतका दर होता. तर पापलेट १२०० रुपये, रावस ४०० रुपये, राणी मासा ४०० रुपये, मोरी मासा ६०० रुपये किलो. ओला बांगडा ३०० तर खेकडा २५० रुपये किलो आहे. 

Advertisement

Advertisement
Tags :

.