ऐश्वर्या-अभिषेक यांचा एकत्र फोटो आणि चर्चेला उधाण
मुंबई
जुलै २०२४ पासून सर्वत्र बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरू आहे. या दरम्यान अनेक समारंभात हे जोडपं वेगवेगळं दिसलं. तर लाडक्या लेकीच्या वाढदिवसालाही हे दोघे एकत्र नव्हते. अशा काही प्रसंगांमुळे ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोटाच्या चर्चेत आहेत.
गोष्टी इथवरं थांबल्या नाहीत, तर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्या रायला तिच्या वाढदिनी शुभेच्छाही दिल्या नाहीत. या घटनाक्रमामुळे घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले आहे.
अशातच अभिषेक-ऐश्यर्या एका लग्न समारंभात एकत्र दिसले. त्या कार्यक्रमातील फोटो सोशल मिडीयावर शेअर झाल्या झाल्या सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. आणि त्याच्या घटस्फोटाच्या चर्चेला तात्पुरता पूर्णविराम मिळाला.
दोघांचेही फॅन्स सोशल मिडीयावर त्यांच्या एकत्र असण्याने खूश असल्याचे कमेंटस् करत आहेत. तर अनेक फॅन्स सोशल मिडीयाद्वारे घटस्फोटाच्या अफवेच्या चर्चा या फोटोमुळे थांबवल्याबद्दल धन्यवादही मानत आहेत.