For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडी येथील ग्रामदेवता परड्यातील आईची यात्रा 8 पासून

06:04 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडी येथील ग्रामदेवता परड्यातील आईची यात्रा 8 पासून
Advertisement

वार्ताहर/ मजगाव

Advertisement

खादरवाडी येथील जागृती देवस्थान ‘परड्यातील आई’ ची यात्रा दर पाच वर्षांनी भरविण्यात येते. सदर यात्रा 2019 मध्ये भरविण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी भरविण्यात येत आहे. त्यानिमित्त खादरवाडी गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यात्रेसाठी यावर्षी युवकांनीही भाग घेतला आहे. त्यामुळे खादरवाडीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दि. 8 रोजी बैलजोड्या जुंपून गाड्यामधून परड्यातील आईची मिरवणूक निघणार आहे. तसेच रात्री भजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दि. 9 रोजी सकाळी कलश मिरवणूक वाजत गाजत निघणार आहे. दुपारनंतर आईची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी गावपंच कमिटी व युवक मंडळे परिश्रम घेत आहेत. तसेच रविवार दि. 12 रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे. त्यासाठी युवक परिश्रम घेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.