Ketan Agrawal Murder Case | चेहरा लपवला तरी एआय पकडणार! केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये पोलिसांचा मास्टरस्ट्रोक; 'असा' होणार तपास
पुणे - पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात आता अतिशय रंजक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे...या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता अशी माहिती समोर आली होती.. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. तर पोलीस कोठडी वाढवु नये , अशी मागणी करत या कटात चेतन सहभागी नव्हताच, असा दावा त्याच्या वकीलांनी केला आहे... त्यांच्या धक्कादायक दाव्यानंतर केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला एक वेगळ वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे..
न्यायालयात नेमकं काय घडलं?
अॅड. राम सहाणे यांनी आरोपी चेतन चौधरीची बाजू मांडली. युक्तिवादादरम्यान एफआयआरमध्ये चेतनचे फक्त दोन वेळा नाव आलेले आहे. सिया सारखं चेतनचं नाव घेते. घटनास्थळाचा पंचनामा, सामानाची जप्ती, समोर बसून चौकशी करणे यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी आधीच दिलेली आहे. लोहगडावर आधी सियाचं नाट्यरूपांतर केलं आणि चेतनचे नाट्य रूपांतर करायचं असं सांगितलं जातंय. चेतनची पॅन्ट जप्त करायची आहे? हुडी, मोबाईल, गाडी जप्त केलेली आहे. तेव्हाच पॅन्ट जप्त का केली नाही? असा सवाल चेतनच्या वकिलांनी उपस्थित केला...मोबाईल फोन सियाकडे होता. मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध? आरोपींनी हत्या करण्याचा सराव केला होता? ते घटनास्थळी जाऊन पाहायचं आहे, असं सांगितलं जातंय. मग सात दिवसांत का गेला नाही? काहीतरी दाखवायचं म्हणून दोन कारणं दिली जात आहेत. कस्टडी वाढवून मागितली जात आहे, असेही आरोपी चेतनचे वकील यावेळी म्हणाले.
पॅन्ट मागितली असती तर ती पण दिली असती
प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही गाडी स्वतः आणून दिली. पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती. , असे म्हणत चेतनला आता पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी चेतनच्या वकिलाने न्यायालयाकडे केली.
या खळबळजणक दाव्यानंतर पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले आहे.. पोलिस आता तो हुडीवाला चेतन आहे की नाही हे तपासण्यासाठी एआयचा वापर करणार असल्याची माहिती समोर येत आहे... कारण जे सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे, त्यात व्यक्तीने हुडी घातली आहे.. ज्यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही.. त्यामुळे
पोलिस आता आरोपी चेतन चौधरी याचं ‘गेट ॲनालिसिस’ (चालण्याच्या पद्धतीची न्यायवैद्यक तपासणी) करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच एआयच्या माध्यमातून केतन चौधरीचा वॉकिंग पॅटर्न तपासण्यात येणार आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि विशेषतः या उद्देशासाठी रेकॉर्ड केलेला चेतनच्या चालण्याचा व्हिडिओ यांची तुलना केली जाणार आहे..