For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअरटेलने ऑनलाइन फसवणुकीवर कडक कारवाई

06:40 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
एअरटेलने ऑनलाइन फसवणुकीवर कडक कारवाई
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारती एअरटेलने महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना वाढत्या ऑनलाइन फसवणुकींपासून संरक्षित करण्याच्या आपल्या मोहिमेत महत्त्वपूर्ण प्रगती जाहीर केली आहे. एआय-संचालित फसवणूक शोध प्रणालीच्या देशव्यापी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, एअरटेलने त्यांची प्रगत फसवणूक शोध प्रणाली लाँच केल्यानंतर अवघ्या 36 दिवसांत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील 2 लाखांहून अधिक ग्राहकांना यशस्वीरित्या सुरक्षित केले आहे.

सर्व एअरटेल मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी स्वयंचलितपणे सक्रिय केलेली ही प्रगत प्रणाली एसएमएस, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल आणि इतर ब्राउझर्समधील लिंक्स स्कॅन आणि फिल्टर करते. ही प्रणाली प्रत्यक्ष वेळेतील (रिअल-टाईम) धोका ओळखण्याची क्षमता वापरते आणि दररोज 1 अब्जांहून अधिक ळथ् तपासते. ही प्रणाली हानिकारक साइट्सवरचा प्रवेश 100 मिलीसेकंदांच्या आत अवरोधित करते.

Advertisement

उदाहरणार्थ, जर पुण्यातील एखाद्या रहिवाशाला असा संशयास्पद संदेश मिळाला की: ‘आपला पॅकेज यायला उशीर झाला आहे. येथे ट्रॅक करा:   आणि जर तो रहिवासी निष्काळजीपणे त्या लिंकवर क्लिक करतो, तर एअरटेलची प्रणाली त्वरित सक्रिय होते. ही लिंक लगेच स्कॅन केली जाते आणि जर ती संशयास्पद आढळली, तर त्या साइटवरचा प्रवेश त्वरित अवरोधित केला जातो. वापरकर्त्याला “ब्लॉक केले आहे! एअरटेलने ही साइट धोकादायक असल्याचे आढळले आहे!” असा इशारा देणाऱ्या संदेशाकडे वळवले जाते. हे सर्व क्षणार्धात घडते. ही प्रत्यक्ष वेळेतील (रिअल-टाईम) कारवाई वापरकर्त्यांना सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवते.

या उपक्रमाबाबत भाष्य करताना, भारती एअरटेलचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज मॅथन म्हणाले, एअरटेलमध्ये आमची मुख्य बांधिलकी ग्राहकांना सर्व प्रकारच्या फसवणुकींपासून संरक्षण देण्याची आहे. आमच्या नेटवर्कची एआय-आधारित फसवणूक शोध प्रणालीसोबत सांगड घालून, आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की आमचे ग्राहक कोणत्याही नव्याने उद्भवण्राया धोकेपासून कोणतीही अतिरिक्त मेहनत न करता सुरक्षित राहतील. आजच पावले उचलून डिजिटल भविष्यासाठी सुरक्षा निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे आम्हाला वाटते आणि महाराष्ट्र आणि गोव्यातील आमच्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक आणि अधिक सुरक्षित नेटवर्क उपलब्ध करून देणारे आघाडीचे  कंपनी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो.

Advertisement
Tags :

.