महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुर्कियेकडून सीरियात हवाई हल्ले, 8 जणांचा मृत्यू

06:04 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Smoke rises from a car after an alleged Turkish strike on Hasakah, Syria, October 5, 2023. North Press Agency/Handout via REUTERS
Advertisement

अंकारा :

Advertisement

तुर्कियेने सीरियातील सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेसकडून नियंत्रित क्षेत्रांमध्ये हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्कियेने एसडीएफ-नियंत्रित क्षेत्रांमध्ये हवाई हल्ले केले असून यात 18 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी तुर्कियेच्या सैन्याने शनिवारी इराक आणि सीरियाच्या क्षेत्रात हवाई हल्ले केले होते. सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेसकडून सीरियातील असाद सरकार विरोधात लढा दिला जात आहे. यामुळे तुर्कियेकडून झालेल्या या कारवाईवर असाद सरकार कुठलाच आक्षेप घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तुर्कियेच्या वायुदलाने उत्तर इराक आणि सीरियात कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या हवाई हल्ल्यात कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीचे सदस्य स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी करत असून याला तुर्कियेचा विरोध आहे. तुर्कियेत कुर्द लोकांची संख्या लक्षणीय आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article