महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विमानांना होणार पाईपलाइनने इंधन पुरवठा?

06:28 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई:

Advertisement

पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलॅरिटी बोर्ड यांनी विमानतळांना पाईपलाईनमार्फत इंधनाचा पुरवठा करण्याची योजना आखली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव समोर ठेवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

विमानांकरिता एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युल या इंधनाचा वापर केला जातो. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विमानाच्या इंधनाचा पुरवठा पाईपलाईन मार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला असून या संदर्भात भागधारक तेल, विपणन कंपन्या, विमानतळ हाताळणी व्यवस्थापन व इतरांकडून सूचना मागितल्या आहेत. अशा पद्धतीने पाईपलाईनमार्फत जर इंधन पुरवठा करण्यात आला तर खर्चामध्ये बरीच बचत होऊ शकणार आहे, असे नियामकाचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article