महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मध्य-पूर्वेच्या आकाशात विमानांचे जीपीएस सिग्नल अचानक गायब

06:11 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डीजीसीए’ने एअरलाईन्सला दिला इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून मध्य-पूर्व भागातील अवकाशात उड्डाण करत असताना प्रवासी विमानांची जीपीएस यंत्रणा अधून-मधून काम करणे बंद करत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. यासंबंधी नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूकने (डीजीसीए) सुरक्षेचा मोठा धोका लक्षात घेऊन सर्व भारतीय विमान कंपन्यांना एक इशारा जारी केला आहे.

मध्य पूर्व हवाई क्षेत्रात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमच्या हस्तक्षेपाच्या वाढत्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्टोबर रोजी अंतर्गत समिती स्थापन केल्यानंतर एक परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकात सुरक्षेशी संबंधित धोके कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: उ•ाणा दरम्यान, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमला जॅमिंगपासून संरक्षण करण्यासाठी आणि स्पुफिंग धोक्मयांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आल्याचे डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सप्टेंबरच्या उत्तरार्धात इराणजवळील अनेक व्यावसायिक उड्डाणे त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टम ठप्प झाल्यानंतर ग्राउंड करण्यात आली. यापैकी एक फ्लाईट स्पुफिंगचा बळी ठरल्यानंतर परवानगीशिवाय इराणच्या हवाई क्षेत्रात पोहोचले होते.   यावषी सप्टेंबरपर्यंत 12 वेगळ्या घटनांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच 20 नोव्हेंबर रोजी अंकाराजवळ तुर्कीमध्येही असाच प्रकार घडला. मात्र, अद्याप या धोक्याला जबाबदार असलेल्याचा शोध लागलेला नाही. प्रादेशिक तणाव असलेल्या भागात लष्करी इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणा तैनात केल्यामुळे जॅमिंग आणि स्पुफिंग होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article