For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे आज उद्घाटन

07:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे आज उद्घाटन
Advertisement

वृत्तसंस्था/वडोदरा

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज हे सोमवारी गुजरातच्या वडोदरा येथे टाटा समुहाच्या एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करणार आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्सकडून सी-295 विमानांची निर्मिती केली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निर्मित सुट्या भागांना जोडून सैन्य विमान तयार करणारे हे भारतातील खासगी क्षेत्राचे पहिले युनिट ठरणार आहे. गुजरात दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे अमरेली येथे 4,900 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीच्या विकास प्रकल्पांचाही शुभारंभ करणार आहेत. द्विपक्षीय कराराच्या अंतर्गत 40 विमाने वडोदरा येथील प्रकल्पात निर्माण केली जाणार आहेत. विमान कंपनी एअरबस 16 विमानांचा पुरवठा करणार आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स भारतात 40 विमानांची निर्मिती करणार आहे.

भारतीय कंपन्या देणार योगदान

Advertisement

सरकारी क्षेत्राच्या कंपन्या भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत डायनॅमिक्स तर खासगी क्षेत्रातील सुक्ष्म, लघू तसेच मध्यम उद्योग या प्रकल्पाकरता योगदान देणार आहेत. यात निर्मितीपासून असेंबली, परीक्षण आणि योग्यता, देखभालीपर्यंतच्या पूर्ण व्यवस्थेचा विकास सामील असेल.

महत्त्वाची उपकरणे एअरबसकडून

सी-295 प्रकल्पाच्या हिस्स्याच्या स्वरुपात 13 हजारांहून अधिक सुटे भाग, 4,600 उप-असेंबली आणि सर्व प्रमुख घटक असेंबलीची निर्मिती देशात केली जाणार आहे. निश्चितपणे इंजिन, लँडिंग गियर आणि एवियोनिक्स यासारखी उपकरणे एअरबसकडून प्रदान केली जातील आणि विमानात एकीकृत करण्यात येतील. टॅक्टिकल एअरलिफ्ट दोन प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू127 जी टर्बोप्रॉप इंजिनद्वारे संचालित आहे. विमान 9 टनापर्यंत पेलोड किंवा 71 कर्मचारी किंवा 45 पॅराट्रूपर्ससह झेप घेऊ शकते. या विमानाचा कमाल वेग 480 किलोमीटर प्रतितास आहे. हे विमान छोट्या किंवा तयार न करण्यात आलेल्या धावपट्ट्यांवरूनही संचालित होऊ शकते.

Advertisement
Tags :

.