कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतातही एअरबस विमानांवर बंदी

06:22 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

नागरी विमानवाहतूक महासंचालकांनी एअरबस या कंपनीच्या काही विमानांच्या उ•ाणांवर बंदी घोषित केली आहे. ए 319, ए 320 आणि ए 321 या प्रकारच्या विमानांचा समावेश या बंदीत करण्यात आला आहे. या विमानांमध्ये ज्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सुधारणा आवश्यक आहेत, त्या केल्याशिवाय या विमानांची उ•ाणे करुन नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जगभरात या विमानांमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या असल्याने या प्रकारची 6 हजारांहून अधिक विमाने सध्या विमानतळांवरच आहेत. भारतानेही आता धोका टाळण्यासाठी, सावधगिरीचा उपाय म्हणून हाच निर्णय घेतला आहे.

Advertisement

या विमानांच्या सर्व तांत्रिक समस्या लवकरात लवकर दूर करण्यात याव्यात. त्या दूर केल्याचे प्रमाणपत्र महासंचालकांकडून मिळविण्यात यावे. त्यानंतरच त्यांच्या उ•ाणांना अनुमती देण्यात येईल. या विमानांवरील बंदी आज रविवारी पहाटे 5 वाजून 30 मिनिटांपासून लागू केली जाईल. त्याच्या आधी कंपन्यांनी छोट्या विमानतळांवरुन विमाने मोठ्या विमानतळांवर न्यावीत, असे स्पष्ट केले गेले आहे.

सौर उत्सर्जनाचा धोका

या प्रकारच्या विमानांना सूर्यापासून होणाऱ्या किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची उ•ाणे बंद ठेवण्यात आली आहेत. याचा फटका एअर इंडिया, इंडिगो आणि अन्य विमान कंपन्यांना बसणार आहे. यामुळे प्रवासी विमानवाहतुकीवर विपरीत परिणाम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article