महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याकडे येणाऱ्या विमानांचे तिकीट दर अव्वाच्या सव्वा

12:08 PM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशविदेशांतून येणारे पर्यटक हैराण : प्रवाशांची मोठी लूट

Advertisement

पणजी : गोव्याकडे हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवासी भाड्याचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले असून पाटणा ते गोवा विमानाचे तिकीट सरासरी ऊ. 10 हजार एवढे झाले आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांतून गोव्याला येणाऱ्या विमानांचे तिकीट दर दुपट्ट तीनपटीपेक्षा जास्त झाले असून त्यातून प्रवाशांची मोठी लूट होत असल्याचे समोर आले आहे. या वाढीव विमान तिकीट दरावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि प्रत्येक विमान कंपनी मनमानी तिकीट दर आकारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाताळ तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक, प्रवासी मोठ्या प्रमाणात गोव्याकडे धाव घेतात. ती वाढती गर्दी पाहून विमान कंपन्यानी त्याचा लाभ घेण्याचे तंत्र वापरले आहे. नाताळ, नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले असून गोव्याकडे एकूण पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. त्याचा परिणाम म्हणून गोव्याला येण्यासाठी पर्यटकांना मोठी किंमत मोजण्याची पाळी आली आहे. मुंबई, पुणे, जयपूर, नागपूर, कोलकाता व इतर ठिकाणाहून गोव्यात येण्यासाठी तिकीट दर भरमसाठ वाढले आहेत. पाटणा येथून गोव्यात मोपा विमानतळाचे तिकीट ऊ.10868, ऊ.10115, ऊ.10368 असे वाढवण्यात आले आहे. येत्या 15 ते 31 डिसेंबरपर्यतच्या काळात गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढण्याची चिन्हे असून हवाई प्रवासी भाडे आणखी वाढण्याची लक्षणे दिसत आहेत.

Advertisement

बसच्या तिकिट दरातही प्रचंड वाढ

मुंबई, पुणे, बंगलोर, हैदराबाद व इतर ठिकाणाहून गोव्यात येणाऱ्या बसगाड्यांचे दरही तेजीत आहेत. खासगी बस कंपन्यांनी देखील या संधीचा लाभ उठवत बसचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. या भरघोस तिकीट दरवाढीत पर्यटक प्रवासी मात्र भरडले जाणार आहेत आणि त्यांना कोणीही वाली नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article