महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इराण समर्थित इराकी सैन्यावर हवाई हल्ला

06:56 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शस्त्रे, लष्कराची वाहने लक्ष्य; अमेरिका, इस्रायलकडून हल्ल्याचा इन्कार

Advertisement

वृत्तसंस्था/ बगदाद

Advertisement

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इराकमधील लष्करी तळावर स्फोट झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. इराण-समर्थित पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स (पीएमएफ) च्या मुख्यालयावर हवाई हल्ला झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हा हल्ला कोणी केला याची माहिती मिळालेली नाही. एका गोदामावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात पीएमएफ उपकरणे, शस्त्रे आणि लष्करी वाहनांना लक्ष्य करण्यात आले.

पीएमएफच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा आरोप अमेरिकन सैनिकांवर केला आहे. मात्र अमेरिकन लष्कराने त्यांचे आरोप फेटाळून लावले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. याशिवाय इस्रायलनेही हल्ल्यातील आपली भूमिका नाकारली आहे. ‘पीएमएफ’ला हशेद अल-शाबी म्हणूनही ओळखले जाते. ही शिया सशस्त्र गटांची एक संघटना असून ती 2014 मध्ये आयएसआयएसशी लढण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. ही संघटना आता इराकच्या सुरक्षा दलाचा भाग आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमएफने इराक आणि सीरियामध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकन सैनिकांवर हल्ले केले होते. हमासविऊद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत असल्याचे संघटनेने म्हटले होते. याच्या निषेधार्थ त्यांनी हा हल्ला केला. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियान यांचे इराणवरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याबाबतचे वक्तव्य समोर आले. इराण सध्या इस्रायलवर कोणत्याही हल्ल्याची योजना आखत नसल्याचे त्यांनी सांगितले. इराणविऊद्ध कोणतीही कारवाई केल्यास इराण पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा इशारा हुसैन यांनी इस्रायलला दिला आहे.

1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी वाणिज्य दुतावासावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या 2 टॉप कमांडरसह 13 लोक मारले गेले. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. हल्ल्यानंतर इराणने इस्रायलकडून बदला घेण्याची धमकी दिली होती. 12 दिवसांनंतर, 13 एप्रिल रोजी इराणने 300 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसह इस्रायलवर हल्ला केला. यादरम्यान नेवातीम लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. तथापि, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह इस्रायलने इराणचे 99 टक्के हल्ले हाणून पाडले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article