वायूप्रदूषणामुळे मुलांच्या मेंदूवर गंभीर परिणाम
वायू प्रदूषण आणि यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी दीर्घकाळापासून चर्चा होत राहिली आहे. अनेक अध्ययन हवेत असलेल्या पार्टिक्युलेट मॅटरमध्ये अत्याधिक हानिकारक आणि प्रतिक्रियाशील कणांचे प्रमाण पूर्वीच्या अनुमानांच्या तुलनेत खूपच अधिक असल्याचे स्पष्ट करत आहेत. अशाप्रकारच्या हवेत श्वास घेणे पूर्ण शरीराला गंभीर स्वरुपात प्रभावित करणारे ठरू शकते.
स्वीत्झर्लंडच्या बेसल विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अहवालानुसार पार्टिक्युलेट मॅटरच्या अत्याधिक संपर्कामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी जगात सुमारे 60 लोकांचा अकाली मृत्यू होत आहे. पार्टिक्युलेट मॅटरचा आरोग्यावरील प्रभाव गंभीरही असू शकतो. वायु प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने मुलांचे आरोग्य प्रभावित होते, यामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होत आहे. ज्या मुलांचा प्रारंभिक काळ प्रदूषणाच्या संपर्कात असतो, त्यांच्यात भविष्यात अनेक प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
मेंदूचा विकास होतोय प्रभावित
वायू प्रदूषण स्मरणशक्ती, भावनांवर नियंत्रण आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पाडते. वायू प्रदूषणात बालपण गेले असल्यास मेंदू विकास प्रभावित होऊ शकतो. पहिल्या दोन वर्षांमध्ये मूल विचार करणे, समजणे, जाणवून घेणे आणि प्रतिक्रिया देण्याच्या मूलभूत क्षमता विकसित करत असते. यादरम्यान त्यांचा प्रदूषित हवेशी संपर्क अधिक राहिल्यास मेंदूचा विकास प्रभावित होतो, तसेच भविष्यात मेंदूशी संबंधित अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांची जोखीम वाढू शकते.
प्रकाशित अध्ययनानुसार मुलाच्या जन्मापासून वयाच्या 12 वर्षांपर्यंत वायू प्रदूषणाच्या उच्च स्तराच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्या मेंदूतील महत्त्वपूर्ण हिस्स्यांदरम्यान फंक्शनल कनेक्टिव्हिटी बाधित होऊ शकते. फंक्शनल कनेक्टिव्हिटीच मेंदूच्या विविध हिस्स्यांना परस्परांमध्ये जोडून विचार करणे, समजणे, भावना व्यक्त करणे आणि निर्णय घेण्यास मदत करत असते.
पीएम 2.5, पीएम10 सारखे सुक्ष्म कण, नायट्रोजन डायऑक्साइड हे घटक मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. भविष्यात यामुळे विस्मृती सारख्या आजारांची जोखीम वाढते, ज्याचा प्रभाव अनेक पिढ्यांवर पडतो.