For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात हवाई प्रवासी वेगाने वाढणार

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
देशात हवाई प्रवासी वेगाने वाढणार
Advertisement

2023 पर्यंत 42 कोटीपर्यंत ही संख्या वाढणार असल्याचा अंदाज : सरकारची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या 14 कोटी झाली आहे आणि 2023 पर्यंत हा आकडा तीन पटीने वाढून 42 कोटी होईल अशी अपेक्षा आहे. नागरी उ•ाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) खासदार संगीता आझाद यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हवाई भाडेवाढीबाबत विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. सिंधिया म्हणाले की, 2014 नंतर नऊ वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या 6 कोटींवरून 14 कोटी झाली आहे, जी 2030 पर्यंत तिप्पट वाढून 42 कोटी होण्याची शक्यता आहे. विमान प्रवाशांच्या या वाढीमध्ये ‘उडान’ योजनाही प्रभावी ठरत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत 76 विमानतळांवरून उ•ाणे सुरू करण्यात आली असून, ‘उडान’ योजनेंतर्गत अल्पावधीत 1 कोटी 30 लाख लोकांनी विमानाने प्रवास केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Advertisement

दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील आझमगड आणि श्रबस्ती विमानतळांसह विविध विमानतळांच्या परवान्याची प्रक्रिया सुरू असून येथून लवकरच उ•ाणे सुरू होतील. आययूएमएलचे खासदार ई.टी. बशीर मोहम्मद यांनी सरकारला विचारले की सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात विमान भाड्यात होणारी गगनाला भिडणारी वाढ रोखण्यासाठी हस्तक्षेप करणार का. यावर केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘आपल्याला नागरी विमान वाहतूक क्षेत्राची स्थिती समजून घ्यावी लागेल. हे एक ‘हंगामी क्षेत्र’ आहे. ही (मोसमी भाडेवाढ) केवळ भारतासाठीच नाही तर एक जागतिक घटना आहे आणि याचे एक कारण म्हणजे ऑफ सीझन कालावधीत एअरलाईन्स तोटा करतात.’  काँग्रेसचे के. सुरेश यांनी पश्चिम आशियाई देशांमध्ये काम करण्राया केरळमधील प्रवासी नागरिकांना सुट्ट्या आणि सणांच्या काळात 10 पट जास्त भाडे देण्याची सक्ती केल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारने यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. यावर सिंधिया म्हणाले की, सरकारने एअरलाइन्सना या देशांच्या फ्लाइट्सची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे आणि तसे झाल्यास भाडेवाढीला नक्कीच आळा बसेल.

Advertisement
Tags :

.