एअर इंडियाची इस्रायल सेवा 31 मे पर्यंत रद्द
पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरील उ•ाणे 31 मे पर्यंत रद्द केली आहेत. बहुतेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी तेल अवीवसाठीची आपली उड्डाणे आधीच स्थगित केली आहेत. सध्या केवळ एल अल, इस्राइर, अर्किया आणि एअर हैफा मर्यादित सेवा चालवत आहेत. या उड्डाण स्थगितीमुळे 40,000 हून अधिक भारतीयांवर परिणाम झाला आहे. त्यांना भारतात पोहोचण्यासाठी जॉर्डन किंवा इजिप्तमार्गे प्रवास करण्याची वेळ आली आहे. तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने 24-तास हेल्पलाइन सुरू केली असून नोंदणी मोहीमही राबवत आहे. राजदूत जे. पी. सिंग यांनी भारतीय कामगार आणि विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. नवी दिल्ली आणि तेल अवीव दरम्यान थेट विमानसेवा 1 जानेवारीपासून सुरू झाली असून बोईंग 787 ड्रीमलायनर्सद्वारे आठवड्यातून चार उ•ाणे चालवली जात होती.