For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडिया सुविधा वाढविणार

06:52 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडिया सुविधा वाढविणार
Advertisement

400 दशलक्ष डॉलर्स खर्चून 67 विमानांमध्ये करणार सुधारणा

Advertisement

नवी दिल्ली :

एअर इंडियाने आपल्या जुन्या विमानांमध्ये आवश्यक सुधारणा(अपग्रेड) करण्यासाठी 400 दशलक्ष डॉलर खर्चाचा नूतनीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. या योजनेंतर्गत एअर इंडिया 67 विमाने रिफिट करेल ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 27 Aग्Rल्s व ए320  आणि 40 बोईंग वाइड-बॉडी विमाने नंतर रीफिट केली जातील. या कार्यक्रमांतर्गत, एअर इंडिया आपले विमान आधुनिक तीन-केबिन लेआउटसह अद्यावत करेल. त्यात नवीन सीट, कार्पेट, पडदे आणि अपहोल्स्ट्री यांचा समावेश असेल.

Advertisement

रिफिट कार्यक्रमाची सुरुवात

पहिले Aग्Rल्s A320 विमान न्न्ऊ-िंXऱ् सोमवारी अपग्रेडसाठी हँगरमध्ये दाखल झाले. विमानाचा प्रोटोटाइप आणि आवश्यक नियामक मंजूरीनंतर, डिसेंबर 2024 मध्ये ते व्यावसायिक सेवेत परत येण्याची योजना आहे. त्यानंतर, दर महिन्याला तीन ते चार विमाने रीफिट केली जातील आणि संपूर्ण नॅरोबॉडी फ्लीट 2025 च्या मध्यापर्यंत अपग्रेड होण्याची अपेक्षा आहे.

नव्या सुविधा उपलब्ध होणार

अपग्रेड केलेल्या ए320 या विमानात बिझनेस क्लासमध्ये आठ लक्झरी सीट्स, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 24 अतिरिक्त लेगरुम सीट्स आणि इकॉनॉमीमध्ये 132 आरामदायी सीट्स असतील. नवीन वैशिष्ट्यांमध्ये प्रशस्त लेगरूम, आधुनिक प्रकाशयोजना, चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट्स (टाईप ए आणि सी) आणि डिव्हाइस धारकांचा समावेश असेल. बिझनेस क्लासमध्ये 40-इंच जागा, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये भरपूर जागा आणि इकॉनॉमीमध्ये एर्गोनॉमिक सीट्स उपलब्ध असतील.

वाइड-बॉडी विमानाचे अपग्रेड

तसेच, एअरलाइन 40 बोईंग 787 आणि 777 विमानांचे अंतर्गत भाग पूर्णपणे सुधारीत करण्याची तयारी करत आहे. यासाठी उच्च दर्जाच्या महत्त्वाच्या जागा आणि इन-फ्लाइट मनोरंजन प्रणालीची निवड करण्यात आली आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर पहिले वाइड-बॉडी विमान 2025 च्या सुरुवातीला अपग्रेड सुरू करणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :

.