For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणे कमी करणार

06:35 AM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणे कमी करणार
Advertisement

सुमारे 800 उड्डाणांचा समावेश : इंधन आणि अन्य खर्चांमुळे निर्णय : इंडिगोही करणार 7 टक्क्यांपर्यंत कपात

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया दर आठवड्याला सुमारे 800 देशांतर्गत उ•ाणे कमी करत आहे. हा बदल जून ते ऑगस्ट 2026 दरम्यान असेल. जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, एका वृत्त अहवालानुसार इंडिगोदेखील आपल्या देशांतर्गत उ•ाणांमध्ये 5 टक्के ते 7 टक्के कपात करू शकते.

Advertisement

एअर इंडिया सध्या दर आठवड्याला सुमारे 4400 उ•ाणे चालवते. यामध्ये सुमारे 3600 देशांतर्गत आणि 800 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. कंपनीने देशांतर्गत उड्डाणांमध्ये 22 टक्केपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाचे म्हणणे आहे की, ते बाजारातील मागणी आणि परिचालन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील. ही परिस्थिती सामान्य आणि स्थिर झाल्यावर, उड्डाणांची संख्या पुन्हा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल.

इराण युद्ध, वाढत्या इंधन किमती

इराण युद्ध आणि वाढत्या इंधन किमती ही प्रमुख कारणे आहेत. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष हे उड्डाणांच्या संख्येत घट होण्याचे मुख्य कारण आहे. जेट इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, इराणी हवाई क्षेत्राचा वापर न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्ग लांबले आहेत आणि पाकिस्तानी हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे परिचालन खर्चही वाढला आहे.

विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च 40 टक्केवरून 60 टक्केपर्यंत वाढला आहे. इंटरनॅशनल ऑटोमोबाइल फेडरेशननुसार, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्षेत्रातील इंधनाच्या किमतींमधील मोठ्या तफावतीमुळे विमान वाहतूक नेटवर्क आर्थिकदृष्ट्या अस्थिर झाले आहे. पूर्वी, विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा 40 टक्के होता, जो आता वाढून 60 टक्के झाला आहे.

मार्च-एप्रिलमध्ये उ•ाणांची संख्याही घटली

एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियसच्या आकडेवारीनुसार, भारतातील चार सर्वात मोठ्या विमान कंपन्यांच्या मार्च आणि एप्रिलमधील कामकाजात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के घट झाली. या कालावधीत इंडिगोने 4.5 टक्के आणि एअर इंडियाने 7.5 टक्के कमी उ•ाणे केली.

सध्या भारतात इंडिगो आणि एअर इंडियाचे वर्चस्व आहे. त्यांचा देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा सुमारे 90 टक्के आहे. दरम्यान, अकासा एअर आपला ताफा लहान असूनही वेगाने विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. या महिन्यात एअर इंडियाने 6 आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे रद्द केली.

Advertisement
Tags :

.