एअर इंडियाकडून 30 विमानांची ऑर्डर
हवाई क्षेत्रातील दिग्ग्ज कंपनी एअर इंडिया आपल्या विमान ताफ्यामध्ये भर घालण्याचा विचार करत आहे. येणाऱ्या काळात कंपनीच्या ताफ्यात 30 विमाने दाखल होणार आहेत. कंपनीने 30 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर नुकतीच दिली असल्याचे समजते. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये वाढत्या मागणीमुळे कंपनीने विमानांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मार्गांवर विमान फेरीची मागणी ग्राहकांकडून केली जात असून त्याचा विचार करुनच नव्याने विमानांची भर घालण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे सीईओ कँबेल विल्सन यांनी अतिरिक्त 30 विमानांची भर घालून विमान सेवा अधिक विस्तारीत देण्यासाठी कंपनीचे भविष्यकाळात प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले आहे. 2023 पासून विमानांची अतिरिक्त वाढीची मागणी पूर्ण केली जात असून पुढील काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने नव्याने विमानांची खरेदी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनी प्रादेशिक तत्त्वावर देशातील विविध शहरांना मागणीनुसार विमानसेवा पुरविण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे.