For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडियाला मिळाले नवे सीईओ

07:00 AM Aug 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडियाला मिळाले नवे सीईओ
Advertisement

टेवोल्डे ग्रेब्रेमारियम यांची नियुक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

हवाई क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाच्या नव्या सीईओपदी टेवोल्डे ग्रेब्रेमारियम यांची निवड करण्यात आली आहे. ते सीईओसह व्यवस्थापकीय संचालक पद सांभाळणार आहेत. यापूर्वी इथियोपियन एअरलाइन्समध्ये ते कार्यरत होते. यापूर्वी कॅम्पबेल विल्सन यांनी आपला सीईओपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कंपनी नव्या सीईओंच्या शोधात होती. अखेर तो शोध संपून टेवोल्डेंच्या रुपाने नवे सीईओ कंपनीला मिळाले आहेत. विल्सन यांनी 2022 मध्ये एअर इंडियाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. नुकसानीत होणारी वाढ व कंपनीच्या सुधारणांना होणारा विलंब या पार्श्वभूमीवर विल्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा 2024 मध्ये दिला. नव्या सीईओंच्या नियुक्तीपर्यंत ते जबाबदारी सांभाळत होते. टेवोल्डे हे आफ्रिकेत सर्वात यशस्वी एव्हिएशन लिडर म्हणून ओळखले जातात.

Advertisement

पूर्वीची कारकिर्द

2011 पासून ते 2022 पर्यंत त्यांनी इथियोपियन एअरलाइन समूहाच्या समूह कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी आपल्या 11 वर्षाच्या कार्यक्राळात हवाई कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात करतानाच आफ्रिकेतील सर्वात मोठी हवाई कंपनी बनण्याचा मान मिळवून दिला. 33 इतकी असणारी विमानांची संख्dया त्यांनी 130 वर पोहचवली. कंपनीच्या विमान प्रवाशांची संख्या 30 लाखवरुन 1.2 कोटींवर पोहचली. तसेच महसुलात 1 अब्ज डॉलरवरुन 4.5 अब्ज डॉलर इतकी जबर वाढ करुन दाखवली.

विली वॉल्श यांनी स्वीकारला पदभार

याचदरम्यान हवाई क्षेत्रातील आणखी एक कंपनी इंडिगोचे नवे सीईओ विली वॉल्श यांनी आपला पदभार स्वीकारण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. याआधीचे सीईओ पीटर एलबर्स यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिकामे होते. दरम्यान या वर्षी मार्चमध्ये विली वॉल्श यांची नव्या सीईओपदी निवड जाहीर केली होती.

Advertisement
Tags :

.