For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

एका वृद्ध प्रवाशाला व्हिलचेअरची सुविधा न पुरविल्यामुळे त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रकरणात नागरी विमानवाहतून नियंत्रण प्राधिकरणाने (डीजीसीए) 30 लाख रुपये दंड ठोठावला आहे. या वृद्ध प्रवाशाचे या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. व्हिलचेअर्सचा तुटवडा असल्याने ती पुरविण्यात आली नाही, हे कारण प्राधिकरणाने फेटाळून लावले होते. या घटनेसंबंधीचा अहवाल एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्याची नोंद घेत एअर इंडियावर प्राधिकरणाकडून ही कारवाई करण्यात आली. वृद्ध प्रवाशांना व्हीलचेअर न पुरविणे हा गंभीर प्रकार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. हा वृद्ध प्रवासी विमानाकडून टर्मिनल इमारतीकडे जाणार होता. त्यासाठी त्याने व्हीलचेअरची मागणी केली होती. पण व्हीलचेअर पुरविण्यात आली नाही. त्यामुळे त्याला हे अंतर पायी चालावे लागले होते. त्यामुळे हृदयावर ताण पडून त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती देण्यात आली होती.

नेमकी घटना काय

Advertisement

हा वृद्ध प्रवासी आपल्या पत्नीसह प्रवास करीत होता. पत्नीलाही व्हीलचेअरची आवश्यकता होती. जेव्हा हे जोडपे विमानातून उतरले, तेव्हा त्यांनी दोन व्हीलचेअर्सची मागणी केली. तथापि, एकच पुरविण्यात आली. तिचा उपयोग पत्नीने केला आणि पती तिच्या व्हीलचेअरसह टर्मिनल इमारतीपर्यंत चालत गेला. हे अंतर जास्त असल्याने वाटेतच तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. विमानाच्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही व्हीलचेअर्स पुरविणे आवश्यक होते. कारण तसा स्पष्ट नियम आहे, असे प्राधिकरणाने आपल्या आदेशपत्रात स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.