For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडिया एक्स्प्रेस जमिनीवर...

06:53 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडिया एक्स्प्रेस जमिनीवर
Advertisement

कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सुट्टीमुळे अनेक उड्डाणे रद्द : केंद्र सरकारने मागवला अहवाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एअर इंडिया एक्स्प्रेस अचानक अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपनीतील अनेक केबिन क्रू सदस्य आजारपणाचे कारण सांगून सामूहिक रजेवर गेल्यामुळे मंगळवारी रात्रीपासून विमान कंपनीची सुमारे 90 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच अनेक विमानफेऱ्या उशिराने सुरू आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालय या समस्येबाबत गंभीर असून मंत्रालयाने या समस्येबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने दिली.

Advertisement

एअर इंडिया एक्स्प्रेसचे वरिष्ठ कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यामुळे मंगळवारी रात्रीपासून कंपनीची विमान वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कर्मचाऱ्यांअभावी अनेक उ•ाणे रद्द करावी लागली असून हजारो प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. कित्येक लोकांचे नियोजन कोलमडले असून विमान कंपनीच्या या कृतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, टाटा समूहाच्या विमान कंपनीचे 200 हून अधिक वरिष्ठ क्रू मेंबर्स रजेवर गेले आहेत. सुटीवर गेलेल्या क्रू मेंबर्सनी आजारपणाचे कारण पुढे केले आहे.

रद्द झालेल्या विमानफेऱ्यांसाठी तिकीट काढलेल्या प्रवाशांना पूर्ण आर्थिक परतावा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच बुधवारी विमानतळावर येण्यापूर्वी प्रवाशांना त्यांच्या उड्डाणाची माहिती तपासण्याचा सल्ला एअरलाईन्सने दिला आहे. उ•ाणे रद्द करण्यात आलेल्या शहरांमध्ये कोची, कालिकत आणि बेंगळूर यांचा मुख्यत्वेकरून समावेश आहे. उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना एकतर एअरलाईनकडून पूर्ण परतावा मिळेल किंवा ते कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचे फ्लाईट पुन्हा शेड्यूल करू शकतील.

समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश

नागरी उ•ाण मंत्रालयाने विमान कंपनीला या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यास आणि डीजीसीए नियमांनुसार प्रवाशांना सुविधा देण्यास सांगितले आहे. सध्या सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी एअरलाईन्स व्यवस्थापनावर भेदभाव आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यानंतर आता मंगळवारी रात्रीपासून अनेक सदस्यांनी शेवटच्या क्षणी आजारी पडल्याची माहिती दिल्यामुळे विमान वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा!

दरम्यान, काँग्रेस आणि सीपीआय केरळने ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे रद्द करण्यात आल्याच्या गैरसोयीकडे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी विनंती त्यानी केली आहे. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात वाद असल्यास त्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहनही करण्यात आले. उड्डाणे रद्द झाल्यामुळे मध्य-पूर्वेला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Advertisement
Tags :

.