For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडिया सीईओंचा राजीनामा मंजूर

06:45 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडिया सीईओंचा राजीनामा मंजूर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

एअर इंडिया आणि इंडिगो या दोन हवाई वाहतूक कंपन्या सध्या चर्चेत आहेत. अलीकडेच इंडिगोच्या सीईओंनी पदाचा राजीनामा दिला होता. पाठोपाठ एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवा सीईओ नियुक्त होईपर्यंत विल्सन हे सीईओपद सांभाळणार आहेत. त्यांच्या नंतरच्या सीईओ पदासाठी उमेदवारांचा शोध कंपनीकडून घेतला जात आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या एअर इंडियाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सीईओ विल्सन यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये अपघात, विमान वाहतुकीमध्ये गोंधळ आणि वाढत्या खर्चासारख्या समस्यांना दोन्ही कंपन्या तेंड देत आहेत. या पार्श्वभूमीवर एअर इंडियांच्या सीईओंचा राजीनामा आल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या भविष्याबद्दल चर्चा होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.