For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टर्बुलेन्समुळे एअर युरोपा विमानातील प्रवासी जखमी

06:42 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
टर्बुलेन्समुळे एअर युरोपा विमानातील प्रवासी जखमी
Advertisement

ब्राझीलमध्ये झाले इमर्जन्सी लँडिंग

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्राझिलिया

स्पेनची राजधानी माद्रिद येथून उड्डाण केलेल्या एका विमानाचे सोमवारी ब्राझीलमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. उरुग्वे येथे जात असलेले एअर युरोपाचे विमान टर्बुलेन्समध्ये सापडले, यामुळे सुमारे 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यानंतर विमान ब्राझीलच्या नातल विमानतळावर उतरविण्यात आले आहे.

Advertisement

टर्बुलेन्सदरम्यान विमानातील छायाचित्रे आणि चित्रफिती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटनेवेळी विमानाच्या एका हिस्स्यातील छताला नुकसान पोहोचले आहे. तर अनेक सीट्सचे देखील नुकसान झाले. तीव्र झटक्यांमुळे अनेक प्रवासी विमानाच्या छताला जाऊन आदळले आहेत. तीव्र टर्बुलेन्समुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करविण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांना उरुग्वे येथे पोहोचविण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती एअर युरोपाकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :

.