For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व मतदारसंघ जिंकण्याचे ध्येय ठेवा

12:56 PM Apr 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्व मतदारसंघ जिंकण्याचे ध्येय ठेवा
Advertisement

भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे कार्यकत्यांना आवाहन : भाजपसाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा सन्मान

Advertisement

पणजी : समर्पण वृत्तीने कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना पक्ष कधीच विसरणार नाही. आतापर्यंत तुम्ही खूप त्याग सहन केला. त्यामुळे भाजप पक्ष आज देशात मजबूत स्थितीत आहे. यापुढेही हातात हात घालून पुढे यावे. राज्यातील 40 मतदारसंघात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आव्हान स्वीकारा. कारण आता 40 ही मतदारसंघ आम्ही ताब्यात घेणार आहोत, अशी गर्जना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी केली. इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अटल स्मृती समेलनात’ दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर,

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार दिगंबर कामत, कुंदा चोडणकर, माजी पर्यटनमंत्री दिलीप पऊळेकर, भाजपचे नेते गोविंद पर्वतकर, भाजपचे खजिनदार संजीव देसाई आदी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री रोहन खंवटे, आमदार दिव्या राणे, आदी उपस्थित होते. दामोदर नाईक म्हणाले, निवडणूक जिंकणे हे ध्येय बाळगताना 40 मतदारसंघात संघटन मजबूत राखणे हे आव्हान कार्यकर्त्यांनी पेलायला हवे. यश, अपयश पचवून एका ध्येयाने अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षासाठी त्याग, समर्पण दिले. हा आदर्श आणि पक्षाची जडणघडण आपल्यासाठी खूप मोठी आहे. पक्षाला मिळालेले हे आनंददायी यश सहजासहजी मिळाले नाही. अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातलेले आहे. त्यामुळेच आता राज्यात 40 मतदारसंघात संघटन वाढीसाठी झटावे, असेही ते म्हणाले. दामू नाईक यांनी या कार्यक्रमात पक्षासाठी काम केलेल्या जुन्या, जाणत्या, तऊण कार्यकर्त्यांचा उल्लेख करून त्यांच्यामुळेच हा पक्ष उभा असल्याचे सांगितले.

Advertisement

अनेकांना अटल स्मृती सन्मान

‘अटल स्मृती समेलनात’ भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, श्रीपाद नाईक, विनय तेंडुलकर, नरहरी हळदणकर, दयानंद मांद्रेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, संजीव देसाई, दिगंबर कामत, सुभाष साळकर, शामराव देसाई, दयानंद सोपटे, नारायण कारेकर, वल्लभ साळकर, राजेंद्र गानू, कुंदा चोडणकर, गौरीश धोंड, देश प्रभू, नवीन पै रायकर, कृष्णी वाळके, विश्वास सतरकर, स्वाती जोशी, विजय नाईक, अन्नपूर्णा शिरोडकर, रामचंद्र बखले, राजा खेडेकर, प्रदीप शेट, गिरीश उस्कईकर, गौरी कामत, गुऊदास वायंगणकर, रवींद्र आमोणकर, मनोहर आडपईकर, प्रीतम राणे, हनुमंत वारंग, भाई पंडित, राजसिंग राणे, महेश कोरगावकर, सुरेंद्र शेट्यो, गोरख मांद्रेकर, दिगंबर आमोणकर, गोविंद पर्वतकर, भगवंत हळदणकर, कान्होबा नाईक, सुहासिनी प्रभुगावकर आदी भाजप कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व ‘अटल स्मृती’ हे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, ‘अटल स्मृती समेलना’निमित्त राज्यभरात 25 डिसेंबरपर्यंत अटल बिहारी वाजपेरी यांच्या कविता वाचन, स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत.

केरळ, तामिळनाडूतही ‘कमळ’ फलवू : मुख्यमंत्री

‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ हे ब्रीद वाक्य स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्यानेच आज देशात कमळ सर्वत्र फुललेले दिसते. केरळ आणि तामिळनाडू या राज्यात जरी भाजपला यश मिळाले नसले तरी या ठिकाणी कमळ फुलण्यास प्रारंभ झालेला आहे. येत्या निवडणुकीत या दोन्ही राज्यात नक्कीच भाजपचे कमळ फुलवू, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप  कार्यकर्त्यांना दिला.

Advertisement
Tags :

.