कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळी साहित्य विक्रीतून पूरग्रस्तांना पाठवली मदत

12:22 PM Oct 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्काऊट गाईड अंतर्गत उपक्रम ; विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

जिल्हा परिषद घारपी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात स्वनिर्मित दिवाळी साहित्याचा बाजार मांडून त्यातून झालेल्या नफ्याची रक्कम मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना पाठवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. लगबग दिवाळी या उपक्रमांतर्गत शाळेतील स्काऊट- गाईड, कब- बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या पणत्या रंगवणे,कागदी लहान,मध्यम , मोठे व चांदणी आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे, वाॅलपिश,पतंग अशा विविध प्रकारच्या साहित्याची स्वनिर्मिती केली. या बनवलेल्या साहित्याचा दिवाळी धमाका बाजार शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.या बाजारात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्यासह दिवाळीसाठी लागणारे रांगोळी पीठ, रांगोळी साचे,साबण,तेल‌ असे विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या दिवाळी बाजाराला घारपी गावातील ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी मांडलेल्या साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांघे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या बाजारातेतून झालेल्या नफ्याची१०२५रूपये ही रक्कम यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पाठविण्यात आली. याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर दिवाळी शुभेच्छा कार्ड तयार करून ही शुभेच्छा पोस्ट कार्ड आपले आप्तेष्ट, अधिकारी पदाधिकारी तसेच विविध मान्यवरांना पोस्टाने पाठवण्यात आली . दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी लाडू ,चकली, शंकरपाळी,चिवडा यांची फराळ पार्टीही आयोजित करण्यात आली होती.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हे विविध उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे.डी.पाटील याच बरोबर सहकारी शिक्षिक मुरलीधर उमरे , आशिष तांदुळे , धर्मराज खंडागळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर , उपाध्यक्षा यशोदा गावडे व सदस्य तसेच अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.शाळेने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख आर. बी. गावडे , विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर गटशिक्षणाधिकारी सविता परब या व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article