महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्धग्रस्त पॅलेस्टाइनला भारताकडून मदत

06:36 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अत्यावश्यक औषधांसह 30 टन सामग्री रवाना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इस्रायलसोबत स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या पॅलेस्टाइनमध्ये स्थिती बिघडत आहे. या समस्येदरम्यान भारताने पॅलेस्टाइनला मानवी मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारताने मदतसामग्रीची पहिली खेप पॅलेस्टाइनसाठी रवाना केल्याची घोषणा विदेश मंत्रालयाने मंगळवारी केली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची यंत्रणा युएनआरडब्ल्यूएच्या माध्यमातून पॅलेस्टाइनला एकूण 30 टन मदतसामग्री पाठविण्यात आली आहे. यात अत्यावश्यक औषधे, सर्जिकल सप्लाइज आणि खाद्यसामग्री सामील असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी दिली आहे.

यापूर्वी जुलैच्या प्रारंभी भारताने पॅलेस्टाइनच्या शरणार्थींसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंत्रणेला 2.5 दशलक्ष डॉलर्सचा निधी जारी केला होता. भारताने दरवर्षी शांततापूर्ण मार्गाने पॅलेस्टाइन मुद्द्यावर तोडगा काढण्याच्या स्वत:च्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. भारताने द्विराष्ट्र तोडग्याचे समर्थन केले आहे. याचा उद्देश इस्रायलसोबत सार्वभौम पॅलेस्टाइन देशाची स्थापना करणे आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबर 2023 पासून संघर्ष सुरू आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 1200 लोक मारले गेले होते. तर दहशतवाद्यांनी 253 जणांना ओलीस ठेवले होते. तेव्हापासून इस्रायलने सातत्याने गाझावर हल्ले केले आहेत. गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनुसार इस्रायलच्या कारवाईत 41,500 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. तर या क्षेत्रात राहणाऱ्या सुमारे 23 लाख लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article