For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातील एआय खर्च तिप्पट होण्याची शक्यता

06:28 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतातील एआय खर्च तिप्पट होण्याची शक्यता
Advertisement

2027 पर्यत पाच अब्ज डॉलर खर्च होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

वर्ष 2027 पर्यंत देशात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) खर्च तिप्पट होऊन पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहचण्याची शक्यता आहे. इन्टेल-आयडीसीच्या अहवालानुसार, भारतातील संस्था एआयवर 1703.8 दशलक्ष डॉलर खर्च करण्याची शक्यता सांगितली जात आहे. भारतातील एआय खर्च 2023 आणि 2027 दरम्यान 5 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि सीएजीआर (चौकट वार्षिक वाढीचा दर) 31.5 टक्के आहे. शरत श्रीनिवासमूर्ती, सहयोगी उपाध्यक्ष, आयडीसी म्हणाले, 2027 पर्यंत एआय सर्वत्र उपस्थित असेल. ‘ते म्हणाले की 2023 मध्ये 209 दशलक्ष डॉलर इतका मोठा खर्च एआय ‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हिजनिंग’ आणि संबंधित सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आला आहे.

Advertisement

पायाभूत सुविधांची तरतूद करण्यात मोठे योगदान

इंटेल इंडिया क्षेत्राचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष विश्वनाथन म्हणाले की, भारत एआयसाठी तयार आहे कारण जगातील सुमारे 20 टक्के डेटा देशात तयार केला जातो आणि ती तिसरी सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ आहे. विश्वनाथन म्हणाले की, तंत्रज्ञान कौशल्य उपलब्धतेच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.

Advertisement
Tags :

.