For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एआय’मुळे नोकऱ्यांना धोका नाही

07:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एआय’मुळे नोकऱ्यांना धोका नाही
Advertisement

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा दावा : अमेरिकेत सायबर सुरक्षा तज्ञांची वाढती मागणी, पॅकेज 76 कोटींपर्यंत मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अलीकडेच न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘हार्ड फोर्क“ या टेक्नॉलॉजी पॉडकास्टच्या होस्ट्सशी संवाद साधला. यावेळी गूगल सर्चचे भविष्य, एआय एजंट्सचा वापर आणि महाविद्यालयीन पदवीधरांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना, पिचाई म्हणाले आहेत की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) जग खूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे लोकांची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. वास्तविक पाहता, लोक अजून इतका मोठा तांत्रिक बदल समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी तयार नाहीत. एका आकडेवारीनुसार, केवळ 16 टक्के लोक एआयला बहुतांशी चांगले मानतात, तर 35 टक्के लोक ते वाईट असल्याचे मानतात.

Advertisement

यावर स्पष्टीकरण देताना पिचाई म्हणाले की, एआयचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि हे तंत्रज्ञान जीवन कसे सुधारू शकते हे दाखवणे, ही तंत्रज्ञान कंपन्यांची जबाबदारी आहे. प्रवेश स्तरावरील तरुणांच्या क्षमता वाढतील एआय लोकांच्या क्षमता वाढवेल. ज्याप्रमाणे स्प्रेडशीटच्या आगमनाने आपल्या कामाची पद्धत बदलली, त्याचप्रमाणे एआय अनेक लोकांसाठी नवीन सुरुवातीचा मार्ग खुला करेल. येत्या काळात, जगातील पूर्वीपेक्षा अधिक लोक कोडिंग करू शकतील, असे पिचाई यांनी म्हटले आहे.

वैद्यकशास्त्रासारख्या व्यवसायांमध्येही मोठा बदल

एआय वैद्यकशास्त्रासारख्या व्यवसायांमध्येही मोठा बदल घडवून आणू शकते. सध्या डॉक्टर कागदपत्रांवर आणि तांत्रिक प्रक्रियांवर खूप वेळ घालवतात, एआय हा वेळ वाचवेल, ज्यामुळे डॉक्टरांना त्यांचा उर्वरित वेळ रुग्णांसोबत घालवता येईल.

सायबर सुरक्षा तज्ञांची मागणी वाढली

एआयच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षा तज्ञांची मागणी झपाट्याने वाढत आहे. जॉब सर्च प्लॅटफॉर्म ग्लासडोरनुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सायबर सुरक्षा नोकऱ्यांमध्ये 11 टक्के इतकी वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे एआय-आधारित कोडिंग साधनांचा वेगाने होणारा वापर, ज्यामुळे सिस्टीममध्ये बग्स आणि सुरक्षा त्रुटींचा धोका वाढतो. टेक कंपन्यांचे कर्मचारी आता मोठ्या प्रमाणावर एआयच्या मदतीने कोड तयार करत आहेत.

तज्ञांच्या मते, यामुळे कामाचा वेग वाढतो, परंतु अनेकदा सॉफ्टवेअरमध्ये त्रुटीही निर्माण होतात. प्रमुख एआय कंपन्यांनी यापूर्वीच इशारा दिला आहे की अँथ्रोपिकच्या ‘मिथोस“ सारख्या मॉडेल्सचा वापर सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा गैरफायदा घेण्यासाठी केला जाऊ शकतो. लिंक्डइनचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, ली किसनर यांच्या मते, सुरक्षा तज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे. एआयचा प्रभाव केवळ सायबर सुरक्षेपुरता मर्यादित नाही.

‘या“मध्ये नव्या नोकऱ्या निर्माण होतील

प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल आणि एआय उद्योगांमध्येही नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. नवीन महाविद्यालयीन पदवीधरांमध्ये एआय इंजिनिअर्सची मागणी सर्वाधिक आहे. गूगलचे उपाध्यक्ष निक फॉक्स म्हणतात की, पूर्वीपेक्षा आता अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची गरज आहे. मात्र, दुसरीकडे टेक इंडस्ट्रीमध्ये कर्मचारी कपातही होत आहे. मेटाने गेल्या आठवड्यात सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. अॅमेझॉनने आधीच 16 हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. स्ट्राइप, स्नॅप आणि ब्लॉकसारख्या कंपन्यांनीही हजारो कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. अँथ्रोपिकच्या ‘मिथोस“ आणि त्यानंतर ओपनएआयच्या जीपीटी 5.4 सायबर मॉडेलमुळे सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकरभरतीत आणखी वाढ झाली. सुरक्षा अधिकाऱ्यांचे पॅकेज 66 ते 76 कोटींपर्यंत पोहोचले आहे.

परिस्थिती जितकी गंभीर मानली जाते तशी ती नसेल

नोकऱ्या जातील आणि एआयमुळे नोकऱ्यांची जागा व स्वरुप बदलले जाईल या भीतीवर ते म्हणाले की, वास्तविक परिस्थिती जितकी गंभीर मानली जाते तितकी गंभीर नसेल. प्रत्येक पिढीला भविष्याबद्दल चिंता असते, परंतु अखेरीस तीच पिढी एक चांगले जग घडवत असते.

-सुंदर पिचाई

Advertisement
Tags :

.