For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एआय नकारात्मक नव्हे सकारात्मक, भरतीत प्रगती

06:22 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
एआय नकारात्मक नव्हे सकारात्मक  भरतीत प्रगती
Advertisement

नोमुराचा अहवाल, 83 हजार जणांना नोकरी

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बऱ्याचदा असे म्हटले जाते की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अनेकांच्या नोकऱ्या बळकावेल. परंतु हा दावा आता खोटा ठरु लागला आहे. एका जागतिक अहवालानुसार भारतामधील रोजगाराची आकडेवारी समोर आली असता एआयमुळे भारतात नोकऱ्या घटण्याऐवजी वाढल्याचे प्रमाण समोर आले आहे. जागतिक पातळीवर एआयचा वापर विविध पातळीवर होत आहे आणि त्याचे विविध परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत आहेत.

Advertisement

मात्र भारतामध्ये एआयचा परिणाम नोकर भरतीवर नकारात्मक ऐवजी सकारात्मक दिसून आला आहे. जागतिक स्तरावरील संस्था नोमुरा यांच्या अहवालामध्ये नवी माहिती समोर आली आहे. त्यांच्या माहितीनुसार भारतामध्ये एआय जेवढ्या नोकऱ्या संपवत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक नव्या संधी रोजगाराच्या देत आहे.

एआयचे नेमके चित्र काय

नोमुराचे अर्थतज्ञ सोनल वर्मा आणि सी. यिंग तोह यांनी आशियातील रोजगारा संबंधातील सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून भारतात एआयमुळे 31921 जणांच्या नोकऱ्या गेल्या किंवा प्रभावित झाल्या आहेत. पण दुसरीकडे याच तंत्रज्ञानामुळे 83,100 नव्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. याचाच सरळ अर्थ असा की, एआयमुळे जाणाऱ्या एका नोकरीच्या बदल्यात 2.6 नव्या नोकऱ्या उपलब्ध होत आहेत.

भारतामध्ये एआयमुळे 83,100 जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. तर 31,921  जणांना नोकरी गमवावी लागली आहे. भारतामध्ये नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. तसेच आपला देश हा जागतिक पातळीवर तंत्रज्ञान सेवा आणि व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंगवर अवलंबून आहे.

एआयची जाण आहे...

कित्येक वर्षापासून भारत कस्टमर सपोर्ट, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि डेटा प्रोसेसिंग या क्षेत्रामध्ये आघाडी घेताना दिसतो आहे. कंपन्या सध्याला अशा अनुभवी प्रोफेशनल्सच्या शोधात आहेत, ज्यांना एआयची चांगली जाण आहे, ज्याने एंट्री लेव्हल स्तरावर नोकऱ्यांची मागणी कमी होण्याचा धोका आहे. भारतासारख्या देशासाठी हा चिंतेचा विषय आहे जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने युवक उद्योगांमध्ये सामिल होत

असतात.

Advertisement
Tags :

.