For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धाचा नकाशा बदलतोय एआय

06:29 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धाचा नकाशा बदलतोय एआय
Advertisement

क्लाउडेने बदलला गेम, जगभरातील सैन्य अलर्ट

Advertisement

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आता युद्धाच्या मैदानात केवळ सपोर्ट टूल नाही, तर गेमचेंजर ठरले आहे. एकही क्षेपणास्त्र न डागता किंवा गोळी न झाडता एआय युद्धाची रणनीति, टार्गेट सिलेक्शन आणि ऑपरेशन प्लॅनिंगला इतक्या वेगाने बदलत आहे, की पूर्ण जगाचे सैन्य हाय अलर्टवर आहे. अँथ्रोपिक कंपनीचे एआय मॉडेल क्लाउडे या बदलाचे सर्वात मोठे उदाहरण ठरले आहे. क्लाउडने अमेरिकेच्या सैन्याच्या इराकवरील स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सैन्य आणि एआयविषयी आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा अनेकदा हॉलिवूड चित्रपट टर्मिनेटर किंवा ऑटोनॉमस शस्त्रास्त्रांचे चित्र नजरेसमोर उभे राहते. परंतु वास्तविकतेत सैन्या क्लाउडे किंवा चॅटजीपीटी यासारख्या लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा (एलएलएम) वापर शस्त्रास्त्रांचा ट्रिगर दाबण्यासाठी नव्हे तर संज्ञानात्मक प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी करत आहेत.

Advertisement

डिजिटल युद्धाच्या मैदानात एआय

सद्यकाळातील युद्ध शस्त्रास्त्रांपेक्षा अधिक डाटावर लढले जात आहे. एका कमांडरकडे उपग्रह, ड्रोन्स, रडार, इंटरसेप्ट करण्यात आलेल्या रेडिओ संदेश आणि सोशल मीडियाद्वारे दर सेकंदाला टेराबाइट्स डाटा येतो. या ‘इन्फॉर्मेशन ओव्हरलोड’ला प्रोसेस करणे माणसांसाठी अशक्य आहे आणि येथेच एआयची एंट्री होते.

इंटेलिजेन्स अन् डाटा प्रोसेसिंगमध्ये एआयचा वापर

सैन्य जनरेटिव्ह एआयचा वापर मुख्यकरून एक सुपर-अॅनालिस्टच्या स्वरुपात करते.

ओपन-सोर्स इंटेलिजेन्स (ओएसआयएनटी) : एआय टूल्श शत्रू देशांचे न्यूज आर्टिकल्स, सोशल मीडिया पोस्ट्स आणि सरकारी पब्लिकेशन्सना रियल टाइममध्ये स्कॅन करत छुप्या पॅटर्नला शोधतात. म्हणजेच एखाद्या खास भागात अचानक वैद्यकीय पुरवठ्याची मागणी वाढणे किंवा सैन्याच्या जमवाजमवीचा संकेत असू शकतो.

इंटरसेप्ट करण्यात आलेल्या डाटाचा अनुवाद : युद्धक्षेत्रात शत्रूचे रेडिओ संभाषण किंवा दस्तऐवजांना त्वरित अनेक भाषांमध्ये म्हणजेच रशियन किंवा चिनीमधून इंग्रजीत अचूक अनुवाद करणे आणि त्यांचा सारांश तयार करणे.

सिग्नलपासून गोंगाट वेगळा करणे : हजारो पानांचा इंटेलिजेन्स रिपोर्ट वाचून कमांडर्ससाठी केवळ 5 बुलेट पॉइंट्समध्ये सर्वात महत्त्वपूर्ण माहिती समारे ठेवणे, जेणेकरून निर्णय लवकर घेता येऊ शकेल.

रणनीतिक योजना अन् वॉर-गेमिंग

परिदृश्य सिम्युलेशन : सैन्य नियोजनकार एआयला जुन्या युद्धांच्या डाटा आणि वर्तमान भौगोलिक परिस्थितींचा इनपूट देतो. मग ते एआयला जर आम्ही पॉइंट ए येथून स्वत:ची तुकडी पाठविली तर शत्रूकडे प्रत्युत्तरादाखल कारवाईसाठी कोणते पर्याय असतील असा प्रश्न विचारतात. एआय संभाव्य धोके आणि ‘व्हॉट-इफ’ परिदृश्यांची पूर्ण यादी तयार करून देतो.

लॉजिस्टिक्स अन् पुरवठासाखळी : सैन्याची हालचाल शस्त्रास्त्रांपेक्षा अधिक इंधन आणि रेशनवर निर्भर करते. एआय हवामान, मार्गांची स्थिती आणि इंधनवापर डाटाचे विश्लेषण करून कधी, कुठे आणि किती पुरवठा पाठवायचा हे सांगते, जेणेकरून कुठलीही तुकडी रसदशिवाय राहू नये.

किंग्स कॉलेज लंडनच्या अलिकडच्या वॉर गेम सिम्युलेशन्समध्ये क्लाउडे, चॅटजीपीटी आणि जेमिनी यासारख्या एआय मॉडेल्सनी 95 टक्के प्रकरणांमध्ये अण्वस्त्रांचा वापर सुचविला. क्लाउडने 64 टक्के सिम्युलेशन्समध्ये आण्विक हल्ल्याची शिफारस केली. एआय माणसांप्रमाणे नैतिक टॅबू मानत नाही, हे केवळ गणित पाहते अन् कुठल्याही स्थितीत विजय पाहेत. आता जगाच्या सैन्य एआयला अस्त्र करत आहेत.

Advertisement
Tags :

.