Medical Service: वैद्यकीय क्षेत्राला AI चे वरदान, रोबोटिक सर्जरी अन् डिजीटल हेल्थ मिशन
रोबोटिक सर्जरी, टेलिमेडिसीनमुळे शस्त्रकिया सुलभ आणि जलद झाल्या आहेत
By : इम्रान गवंडी
कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील सेवांमध्ये विकसित आधुनिक तंत्र, कृत्रिम बुद्धीमत्तेची (एआय) भरारी विविध आजारांवरील उपचारासाठी वरदान ठरत आहे. तज्ञांचे संशोधनासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयाने रोगांचे निदान, उपचार आणि प्रतिबंधामध्ये क्रांतिकारी पाऊल टाकले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील एआय टेक्नॉलॉजीमुळे जटील आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. कमी वेळ आणि कमी त्रास असे उपचार आता शक्य झाले आहेत. कर्करोगांसह अनेक दुर्मिळ आजारांचे निदान सहज शक्य झाले आहे. रोबोटिक सर्जरी, टेलिमेडिसीनमुळे शस्त्रकिया सुलभ आणि जलद झाल्या आहेत.
स्मार्टवॉच, फिटनेस वॉकरचा हृदय आणि रक्तदाबासाठी प्रभावी लाभ होत आहे. वैद्यकीय क्षेत्राने मानवाच्या गरजा लक्षात घेऊन बदलत्या काळानुसार प्रत्येक टप्प्यावर प्रगती केली आहे. भारतानेही जागतिक पातळीवर वैद्यकीय क्षेत्रात आधुनिकतेचा प्रभाव टाकला आहे.
वैद्यकीय तंत्रज्ञानातील आधुनिक बदल :
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग : आज एआयच्या विस्तारामुळे अनेक आजारांचे अचूक निदान केले जात आहे. देश-परदेशातून, आहे त्या ठिकाणावरून डॉक्टरांना उपचार करणे सोपे झाले आहे. कर्करोगासारख्या आजारांचे प्राथमिक टप्प्यातील निदान Aघ् वर आधारित अल्गोरिदमद्वारे शक्य झाले आहे. रेडिओलॉजीमध्ये, Aघ् स्वॅ ढनमधून सूक्ष्म बदल ओळखून डॉक्टरांना उपचारासाठी मदत होत आहे.
टेलिमेडिसीन : दुर्गम भागातील लोकांसाठी टेलिमेडिसिन एक क्रांतिकारक पाऊल ठरले आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून रुग्ण घरी बसून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. या सेवेचा विस्तार वाढला आहे. व्हर्च्युअल रिअॅ लिटीच्या सहाय्याने रुग्णांचे परीक्षणही शक्य आहे.
जेनेटिक थेरपी आणि पर्सनलाईज्ड मेडिसीन : जीन एडिटिंग तंत्रज्ञान, जसे की ण्Rघ्एझ्R, आता दुर्मिळ जनुकीय आजारांवर उपचारासाठी वापरले जात आहे. रुग्णाच्या डीएनएवर आधारित वैयक्तिक औषधे करणे हे आता स्वप्न राहिलेले नसल्याचे या विभागातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
वेअरेबल डिव्हायसेस : स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स आता फक्त व्यायाम मोजण्यापुरते मर्यादित नाहीत. ते हृदय गती, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, झोपेच्या गुणवत्तेचे विश्लेषणही या उपकरणाच्या माध्यमातून होत आहे. ’
त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना आजाराशी निगडित प्रत्येक हालचालींवर स्वत:हून काळजी घेता येते, असे हृदयरोग तज्ञ सांगतात.
रोबोटिक सर्जरी
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हे तंत्रज्ञान अचूकता, कमी रक्तस्त्राव व रूग्ण जलद रिकव्हर होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. रूग्णांना अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारात याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग भरारी आहे, असे तज्ञांकडून स्पष्ट केले जात आहे.
डिजीटल हेल्थ मिशन
‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत डिजिटल हेल्थ मिशनने प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ आयडी प्रदान केला आहे. त्यामुळे रुग्णांचा वैद्यकीय इतिहास एका क्लिकवर उपलब्ध होतो. स्वदेशी संशोधनातून बनवलेली कोव्हॅक्सिन,इतर लसींनी भारताची वैद्यकीय क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे.