एआय बबलू माकडाची क्रेझ
इंटरनेटवर तुम्ही अनेक व्लॉगर्सचे व्हिडिओ पाहिले असतील, जे व्लॉगद्वारे देशविदेशाला स्वत:च्या नजरेतून सादर करत असतात. सर्वसाधारणपणे हे काम माणूसच करतात, परंतु हेच काम एखादा माकड करू लागला तर? सोशल मीडियावर सध्या एक अनोखे माकड चर्चेत आहे. याचे नाव बबलू आहे. हा खास माकड देशभरात व्हर्च्युअली फिरतोय आणि देशी हिंदीत मजेशीर शैलीत त्या ठिकाणांविषयी सांगतोय. त्याच्या प्रत्येक रीलला लाखो ह्यूज मिळत असून लोक त्याच्या शैलीला पसंत करत आहेत. बबलू माकड केवळ सोशल मीडिया कॅरेक्टर नव्हे तर एक ट्रेंड ठरला आहे.
हे माकड खरेखुरे नसून बबलू पूर्णपणे एआय जनरेटेड कॅरेक्टर असून याचे हेच वैशिष्ट्या त्याला इतरांपासून वेगळे स्वरुप प्राप्त करून देत. त्याचे वागणे, त्याची चाल आणि देसी शैली हे सर्वकाही इतके रियल वाटते की लोक हे अॅनिमेटेड असल्याबद्दल विश्वासच ठेवू शकत नाहीत.
बबलू माकडाच्या क्रिएशनमागे लखन सिंह आहेत. लखन सिंह हे स्वत: डिझाइनयर, क्रिएटर असून ते स्वत:ला ड्रीमर संबोधितात. लखन यांनी बबलूद्वारे क्रिएटिव्हिटीला कुठलीच मर्यादा नसल्याचे दाखवून दिले आहे. या बबलू माकडाचे विविध ठिकाणांशी संबंधित व्हिडिओ सध्या चर्चेत असून लोकांकडून त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे.