For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जितो लेडीज विंगतर्फे 31 रोजी अहिंसा रन-2024

10:03 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
जितो लेडीज विंगतर्फे 31 रोजी अहिंसा रन 2024
Advertisement

बेळगाव : जितो लेडीज विंगच्या बेळगाव शाखेतर्फे रविवार दि. 31 मार्च रोजी अहिंसा रन-2024 आयोजित करण्यात आली आहे. 3, 5 व 10 कि.मी. अशा तीन गटात ही रन होणार आहे. जात, पात, धर्म, पंथ हे सर्व भेद बाजूला ठेवून एकात्मतेसाठी एकत्र येणे आवश्यक आहे. या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती जितोच्या चेअरपर्सन माया जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जितोचे समन्वयक अभय आदीमनी म्हणाले, गेल्यावर्षी 2 एप्रिल रोजी 22 देशांत 61 ठिकाणी एकाचवेळी अहिंसा रनचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये 1 लाख 16 हजार 942 धावपटू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झाले होते. याची गिनीज वर्ल्डरेकॉर्डमध्ये नोंद झाली. या रनसाठी पंतप्रधान, राष्ट्रपती व अन्य देशातील नेत्यांनी शुभेच्छा पाठविल्या होत्या. यंदा 31 मार्च रोजी हा उपक्रम होणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. सहभागी सर्वांना टीशर्ट, प्रमाणपत्र, पदक आणि अल्पोपहार देण्यात येणार आहेत. ही रन यशस्वी व्हावी यासाठी जितोचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती सचिव ममता जैन यांनी दिली. याप्रसंगी जितो बेळगाव शाखेचे चेअरमन विरधवल उपाध्ये, युवा विभागाचे दीपक सुभेदार, उपक्रम संयोजक किर्ती दो•ण्णावर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.