आहना कुमरा करतेय अभिनेत्याला डेट
दानिश पंडोरसोबत रिलेशनशिपमध्ये
‘धुरंधर’ चित्रपटात रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच ही क्रूर भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पंडोर सध्या चर्चेत आहे. दानिश हा बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. दानिशचे नाव अभिनेत्री आहना कुमरासोबत जोडले जातेय.
आहनाने इन्स्टाग्रामवर स्वत:ची आणि दानिशची काही छायाचित्रे शेअर केली असून यात दोघेही रोमँटिक पोझ देताना दिसून येत आहेत. दानिश आणि आहना यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या बॉलिवूडच्या वर्तुळात रंगू लागली आहे. आहना आणि दानिश यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.आहना ही बॉलिवूडमध्ये मागील काही काळापासून सक्रीय असून अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे. परंतु तिला अद्याप स्वत:चे स्थान निर्माण करता आलेले नाही. पण ती सोशल मीडियावर सक्रीय असते आणि तिचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. तर दानिश बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्याला धुरंधर चित्रपटामुळ काही प्रमाणात यशही मिळाले आहे.